मंदार किवळेवर कोयत्याने हल्ला, मात्र गोळीबार नाही; पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

पुण्यातील न्यायालय परिसरात मंदार किवळेवर कोयत्याने हल्ला झाला असून, पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार झाला नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

Published On: 

Pune Police Commissioner statement on Mandar Kiwale court attack

पुणे, 25 नोव्हेंबर: पुण्यातील न्यायालय परिसरात दिवसाढवळ्या दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मंदार किवळे या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, या हल्ल्यात कोणताही गोळीबार झाला नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या ३ तासांत ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या मंदारला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्याला ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला असून, तो ९९ टक्के बरा होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत, मात्र मंदारला गोळी लागल्याची कोणतीही खूण डॉक्टरांना आढळलेली नाही. गोळीबार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही दिसून आलेले नाही आणि तसा कोणताही साक्षीदार नाही.

हल्ला झालेला मंदार किवळे हा स्वतः एका खून (कलम ३०२) प्रकरणात आरोपी आहे. अवघ्या ४ दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. याच गुन्ह्यातून त्याच्यावर हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक संशय पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. हल्ला करून पळून जाणाऱ्या संशयितांना पोलिसांनी दौंड, डेक्कन आणि आंबेगाव पठार या वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

न्यायालय परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. यापुढे न्यायालय परिसराचे सुरक्षा ऑडिट करण्यात येईल आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा प्राथमिक स्तरावर तपास सुरू असून ताब्यात घेतलेल्यांची नावे आणि वय अद्याप समजू शकलेले नाही.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही