सलाईनमधून इंजेक्शन दिल्यानंतर १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांचे रुग्णालयावर गंभीर आरोप

मूर्तिजापूरच्या अवघाते बाल रुग्णालयात उपचारादरम्यान १० महिन्यांच्या खुशी जाधव या चिमुकलीचा मृत्यू झाला असून, चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Published On: 

Akola Murtizapur hospital infant death relative allegations

अकोला, 21 नोव्हेंबर: सर्दी आणि खोकल्याचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे उघडकीस आली आहे. सलाईनमधून पिवळ्या रंगाचे इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात मोठा रोष व्यक्त केला जात आहे.

रामगाव रामेश्वर येथे राहणारे अजय आणि अंजली जाधव यांच्या दहा महिन्यांच्या खुशीला सर्दी-खोकला आणि छातीत कफ झाला होता. त्यामुळे तिला उपचारासाठी मूर्तिजापूर येथील अवघाते बाल रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत अवघाते यांनी तपासणी करून खुशीला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जाधव कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात भरती केले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर खुशीची प्रकृती स्थिर वाटत होती. मात्र, काही वेळाने एका परिचारिकेने तिला सलाईन लावले आणि त्यातून पिवळ्या रंगाचे इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर खुशीचे हातपाय अचानक वाकडे झाले आणि काही क्षणांतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सलाईनमधून नक्की कोणते औषध देण्यात आले आणि त्यानंतर लगेच चिमुकलीची प्रकृती का बिघडली, याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. आता या प्रकरणी आरोग्य विभाग आणि प्रशासन काय कारवाई करणार आणि मृत्यूचे नेमके कारण काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही