टोरंट प्रकल्पाला आता अजितदादा गटाचाही विरोध; सुनील तटकरे यांच्या मागणीने सरकारची डोकेदुखी वाढली

टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून ठाकरे गटानंतर आता सुनील तटकरे यांनीही सरकारकडे प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

Published On: 

Sunil Tatkare opposes Torrent hydroelectric project in Karjat

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: भीमाशंकर परिसरातील टोरंट जलविद्युत प्रकल्पाला आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटानेही विरोध दर्शवला आहे. ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेसच्या तीव्र विरोधानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी करत राज्य सरकारचे टेन्शन वाढवले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने या प्रकल्पासाठी विविध परवानग्या मिळवल्या असल्या, तरी सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे होणारी मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकल्पाचा पुन्हा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कर्जतमध्ये जाऊन प्रकल्पाची पाहणी करत स्थानिकांशी संवाद साधला होता, तसेच हा प्रकल्प होऊ न देण्याचा इशाराही दिला होता. यावर, प्रकल्प कसा योग्य आहे आणि तोडलेल्या झाडांच्या बदल्यात लाखो नवी झाडे कशी लावली जातील, असे समर्थन सरकारचे मंत्री करत होते. मात्र, आता सत्तेतील महत्त्वाच्या पक्षानेच विरोधाची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले आहे. प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड आणि रस्त्याच्या कामासाठी जमीन मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा साई डोंगर परिसराला भेट देऊन वृक्षतोड झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वाढत्या वादानंतर आता ठाकरे गटाकडून या प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असून, संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही