‘पाकिस्तानने बॉटल कॅप्स वापरले’, सँडपेपर गेट वादावर उस्मान ख्वाजाच्या दाव्यानंतर शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य

उस्मान ख्वाजाने सँडपेपर गेटबाबत केलेल्या दाव्याला शोएब अख्तरने दुजोरा दिला असून, पाकिस्तान संघ इंग्लंडमध्ये बॉल टॅम्परिंगसाठी बॉटल कॅप्स वापरत असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

Published On: 

Shoaib Akhtar reacts to Usman Khawaja Sandpapergate claims

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: २०१८ च्या ‘सँडपेपर गेट’ प्रकरणावरून क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने केलेल्या ताज्या दाव्यांवर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने उडी घेतली आहे. या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन करताना अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

२०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तिघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, नुकतेच ख्वाजाने असा दावा केला आहे की, या प्रकाराची माहिती केवळ या तीन खेळाडूंनाच नव्हे, तर कोचिंग स्टाफसह संपूर्ण संघाला होती.

अख्तरने सांगितले की, आता हा विषय विसरून जायला हवा. तो म्हणाला, “मित्रा, आता हे सोडून द्या. तुम्ही याचा एवढा बाऊ का करत आहात? मला समजते की यामुळे क्रिकेटचे नुकसान झाले आहे, पण आमच्या क्रिकेटचेही नुकसान झाले. आम्ही इंग्लंडमध्ये सँडपेपर नाही, तर बॉटलचे टोपणे (बॉटल कॅप्स) वापरायचो. आम्ही चेंडू बदलायचो आणि इतरही अनेक गोष्टी करायचो. तुम्ही सत्य समोर आणले हे ठीक आहे, पण त्याचा इतका बाऊ करू नका.”

अख्तरने पुढे स्पष्ट केले की, त्याला आपल्या माजी सहकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. पण तो त्यांना गोत्यात आणून कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही. त्याने सांगितले, “कधी कधी मला वाटायचे की मी २२ जणांविरुद्ध खेळत आहे. कारण मी ज्याच्याविरुद्ध खेळायचो, त्यांच्यावर बारीक लक्ष असायचे. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे मला समजत नसे.”

उस्मान ख्वाजाच्या दाव्याला दुजोरा देताना अख्तर म्हणाला की, बॉल टॅम्परिंग हा केवळ दोन-तीन जणांचा निर्णय असू शकत नाही, तो संपूर्ण संघाचा निर्णय असतो. खेळताना आपणही क्रिकेटच्या चेंडूसोबत सर्व प्रकारच्या गोष्टी केल्याचे त्याने मान्य केले. “संपूर्ण संघाला हे माहित असायचे, कारण जर आम्ही चेंडू रिव्हर्स स्विंग केला नसता, तर आम्ही सामने जिंकू शकलो नसतो,” असे तो म्हणाला.

सध्या समोर येत असलेली माहिती म्हणजे पूर्णपणे अराजकता असल्याचे मत अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला, “हे व्हायला नको होते. ख्वाजाने जे केले ते योग्य आहे, पण यासाठी यापेक्षा चांगली वेळ निवडता आली असती.”

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही