प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मोठा अलर्ट जारी केला असून, महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे.
उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून, ते वायव्य दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. हे ‘अक्कान’ चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात अधिक तीव्र होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमान घसरत होते, मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यांमधून थंडी अचानक गायब झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवेल. शनिवारपासून विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांनाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार असल्याने अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशमधील यानम आणि नेल्लोर दरम्यानच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्री राजीनामा देतील: एसआरए घोटाळ्यावरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? कपड्यांपासून आहारापर्यंत ‘या’ खास टिप्स ठरतील फायदेशीर







