प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एका प्रवचनादरम्यान प्रेम आणि नात्यांवरून पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या केवळ पैशांवर प्रेम करतात, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एका नव्या चर्चेला उधाण आले आहे.
प्रेमाचे स्वरूप आणि पैशाचे महत्त्व यावर प्रकाश टाकताना त्यांनी तरुणाईच्या मानसिकतेवर भाष्य केले. अनेकदा तरुण मुलांना असे वाटते की मुली आपल्यावर प्रेम करतात, पण हे सत्य नसते, असे ते म्हणाले. “प्रेम वगैरे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत,” असे सांगत मुलींचे प्रेम हे पैशांशीच संबंधित असते, असे मत त्यांनी या प्रवचनात मांडले.
यावेळी इंदुरीकर महाराजांनी प्रेमाची स्वतःची अशी एक वेगळी व्याख्याही सांगितली. “लव्ह इज मनी अँड मनी इज लव्ह. मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी,” अशा शब्दांत त्यांनी पैशांचे महत्त्व विषद केले. त्यांच्या या नव्या विधानामुळे समाजात सार्वजनिक पातळीवर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Winter Health Care: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरी, गूळ, तुपासह आहारात करा ‘हे’ बदल
- अर्णब, मुरासूनंतर आता ‘अकवान’ चक्रीवादळाचे संकट; विदर्भासह ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- ४००० कोटींच्या ‘रामायण’मध्ये झळकले हे ५ मुस्लिम कलाकार; जाणून घ्या कोणाची कोणती भूमिका?







