पंढरपूर, 18 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशीला अवघे दोन दिवस उरलेले असताना पंढरपुरात गोळीबाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार राजा भिंगे याच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. वारीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना पंढरपुरातील इसबावी परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. राजा भिंगे हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर शतपावली करत होते. याच दरम्यान अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गोळीबारानंतर जखमी भिंगे यांना तत्काळ जवळच्या लाईफलाईन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. राजा भिंगे यांच्यावर हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून अधिक तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर
- AUS vs ENG 3rd ODI: मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भिडणार; जाणून घ्या खेळपट्टी, हवामान आणि Playing 11
- खराब फॉर्मनंतर सईम अयुबचा क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय; मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचे केले स्पष्ट








