मफलर मॅन आणि दादांच्या अपघाताच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘हा विषय अस्वस्थ करणारा…’

रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ आणि अपघाताच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचे सुळे म्हणाल्या.

Published On: 

Supriya Sule Opens Up on Sharad Pawar–Ajit Pawar Reunion Possibility

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी ‘मफलर मॅन’ आणि दादांच्या अपघाताबाबत नुकत्याच केलेल्या विधानांवर आपली भूमिका मांडली. “मी रोहित पवारांशी बोलणार आहे, कारण हा विषय अस्वस्थ करणारा आहे,” अशी थेट प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

काल झालेल्या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित नव्हतो, मात्र आज वर्तमानपत्रात यासंदर्भातील बातमी वाचल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या अपघाताची पारदर्शक आणि वेळेत चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशी अहवालाची आपण वाट पाहायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, योग्य प्राधिकरण याबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही त्या म्हणाल्या.

राजकीय घडामोडींसोबतच त्यांनी स्थानिक प्रश्नांवरही भाष्य केले. प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत दुष्काळी परिस्थिती, रोजगार हमी योजना आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा केल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशा वंचित शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे आपली नोंद करावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही