‘भविष्यात आमदारही होणार नाही…’, भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना थेट इशारा

भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर घणाघाती टीका करत भविष्यात पुन्हा आमदारही होणार नसल्याचा सक्त इशारा दिला आहे.

Published On: 

BJP MLA Rajendra Raut criticizing Rohit Pawar

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. रोहित पवार यांनी आपले तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांना या आरोपांची मोठी किंमत मोजावी लागेल. गृहमंत्रीपद तर खूप दूरची गोष्ट आहे, राज्यात मंत्री होण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्या, भविष्यात तुम्ही पुन्हा आमदारही होणार नाही, असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे.

रोहित पवार ही डोक्यावर पडलेली व्यक्ती असून, ते मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला. रोहित पवार हे काँग्रेसच्या वाटेवर चालणारे पिल्लू असून ते प्रत्येक विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. घरात त्यांना कोणतीही किंमत नसून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांचे अजिबात जमत नाही. आपणच राज्याचे विरोधी पक्षनेते आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

अजित पवार यांची जागा कशी मिळवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, अजितदादांच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दाखवले गेलेले फोटो ‘एआय’च्या (AI) माध्यमातूनही तयार केलेले असू शकतात, असे सांगून राऊत यांनी रोहित पवार यांना कुठेही किंमत नसल्याने ते असे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. इतरांचेही कोणासोबत फोटो आहेत, याच्या बऱ्याच चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळे यांचीही आता डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याची तयारी झाली असल्याचा दावाही राऊत यांनी केला. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांच्यावर किती प्रेम होते, हे आपण जवळून पाहिले असून या दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय मैत्रीपूर्ण दोस्ताना होता, असेही राजेंद्र राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही