अजितदादा विलिनीकरणाबाबत माझ्याशी बोलले होते; अजित पवार गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत गौप्यस्फोट केला आहे. निधनापूर्वी अजितदादा विलिनीकरणाबाबत बोलले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Published On: 

Sunetra Pawar and Sharad Pawar during NCP political developments

मिरज, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ‘अजितदादांचे निधन होण्यापूर्वीच ते माझ्याशी विलिनीकरणाबाबत बोलले होते’, असा मोठा गौप्यस्फोट नायकवाडी यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चा फेटाळल्यानंतरही या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मिरज येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इद्रिस नायकवाडी यांनी ही माहिती दिली. अजितदादांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी आपली त्यांची भेट झाली होती, असे ते म्हणाले. त्यावेळी दादांनी ‘आमच्या पक्षात नसणाऱ्या एका सहकाऱ्याशी तुमचे संबंध कसे आहेत?’, अशी विचारणा केली होती. त्यावर आपण ‘कशासाठी?’ असा सवाल केला असता, ‘भविष्यात आपल्याला एकत्र यावे लागेल’, असे सूचक विधान अजितदादांनी केल्याचा दावा नायकवाडी यांनी केला.

अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू होत्या, असेही नायकवाडी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पुन्हा हवा मिळाली असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, नायकवाडी यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर अधिक भाष्य करणे टाळले.

दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘माझा भाऊ गेला, तिथेच विषय संपला. आमच्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे’, असे सुळे यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून कोणीही चर्चा करत नसून समोरून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्या म्हणाल्या. संसदेत किंवा समित्यांच्या बैठकीत सर्व खासदार एकमेकांना भेटतात, याचा अर्थ विलिनीकरणावर चर्चा होते असा होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडी आणि चर्चा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा चालली. या बैठकीतही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्याप कोणत्याही बाजूने याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही