दिवाळीत सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी; पिठलं-भाकरी खात जाणून घेतल्या अडचणी

सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Published On: 

Sunetra Pawar having meal with farmers in Baramati

बारामती, 12 नोव्हेंबर: दिवाळीच्या सणात भाऊबीजेचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील सोनलकर वस्तीवर शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन पिठलं-भाकरी आणि कांदा खात आपुलकीने दिवाळी साजरी केली.

या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी मूर्टी आणि आसपासच्या गावांमधील दुष्काळग्रस्त भागातील पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. पाणीटंचाई आणि दुष्काळाचा शेतीवर झालेला परिणाम समजून घेतानाच, शासनाकडून देण्यात आलेल्या अग्रीम मदतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडे विचारपूस केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी, मागण्या आणि शेतीविषयक समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. यातील काही प्रश्नांवर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच, उर्वरित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या चारा बियाण्यांच्या पाकिटांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतावर पिठलं-भाकरी खाणे हा केवळ स्नेहभोजनाचा क्षण नसून, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संवाद असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

कोणतेही संकट आले तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या भावनेतूनच त्यांनी अंबी बुद्रुक येथे जाऊन शेतकरी बांधव आणि अजितदादांच्या लाडक्या शेतकरी भगिनींची भेट घेत पिकांची परिस्थिती पाहिली.

यंदा पावसाने ओढ दिल्याने पिके वाळून गेली असून पाण्याची चिंता सतावत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शेतीचा खर्च कसा भागवायचा, या शेतकरी भगिनींच्या रोजच्या संघर्षाची जाणीव झाल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांनी शेतकऱ्यांशी जपलेला विश्वासाचा जिव्हाळा कायम ठेवत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी भाऊबीज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही