राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवारांचाच विरोध; नियंत्रण जाण्याच्या भीतीने प्रक्रिया थांबली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षावरील नियंत्रण जाण्याच्या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Published On: 

Sunetra Pawar and Sharad Pawar during NCP political developments

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला सध्या वेग आला असला, तरी या प्रक्रियेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीच पक्षावरील नियंत्रण सुटण्याच्या भीतीने या विलिनीकरणाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सध्या ही प्रक्रिया थांबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या राजकीय चर्चेला अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हवा दिली आहे. त्यातच आज अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याने घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली होती. मात्र, आता पक्ष पुन्हा नियंत्रणात आणून एकजूट टिकवण्यासाठी शरद पवार सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, संसदेत आपली स्थिती भक्कम करून विरोधकांना कमकुवत करण्यासाठी भाजपला शरद पवार व त्यांच्या लोकसभा खासदारांचे समर्थन हवे आहे. याच अनुषंगाने प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्याशी दीड तास चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विलिनीकरणानंतर वर्चस्व संपेल, या चिंतेतून सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. शरद पवार आपली धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडून मोदी-शाहांच्या नेतृत्वाखाली काम करतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यातून सुनेत्रा पवार यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले.

भाजपने या बैठकीत विलिनीकरणाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याचा आग्रह धरला असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाच पुढे केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या भेटीनंतर नेत्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडल्याचेही ‘इंडियन एक्सप्रेस’ने म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपले पर्याय खुले ठेवले असून सुप्रिया सुळे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांना ‘सेट’ करण्याची त्यांची तयारी आहे. तसेच, पक्षाची कायदेशीर लढाई आपणच जिंकू, असा पवारांना विश्वास आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही