अर्शदीप सिंगचा समरीनसोबत साखरपुडा; टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या सिनेस्टाईल प्रपोजलचे फोटो व्हायरल

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मैत्रीण समरीनसोबत साखरपुडा उरकला आहे. अर्शदीपच्या या सिनेस्टाईल प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Published On: 

Arshdeep Singh proposes to Samreen in a filmy style during their engagement

मुंबई, 11 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेड डीलमध्ये पंजाबची साथ सोडून आयपीएलसाठी मुंबई इंडियन्समध्ये (MI) सामील झालेल्या अर्शदीपने, आपली मैत्रीण समरीनसोबत साखरपुडा उरकला आहे.

बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी अर्शदीपने अगदी फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून समरीनच्या बोटात अंगठी घातली. या जोडीच्या हटके आणि सिनेस्टाईल प्रपोजलचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

या दोघांनीही सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आयुष्य जे काही देऊ शकतं, त्यापैकी सर्वात मोठा आनंद याच गोष्टीचा आहे की, त्याने आपल्याला एकमेकांची साथ दिली. आयुष्यभराच्या या सहप्रवासाच्या नावाने… ११.११.२०२६ (हॅपी एंगेजमेंट!),’ अशी इन्स्टाग्राम पोस्ट अर्शदीपने केली आहे.

अर्शदीपच्या या नव्या वाटचालीसाठी क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज, मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या ट्विटर हँडलवर या जोडीचे फोटो शेअर करत, ‘अर्शदीपसाठी आजची तारीख 11-11-27 ही खरंच खास आहे. अभिनंदन अर्शदीप आणि समीरन…’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र असलेले समरीन आणि अर्शदीप आता जीवनसाथी बनणार आहेत. समरीन ही पंजाबी मनोरंजन विश्वाशी जोडलेली असून तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त, कपिल देव यांच्या जीवनावर आणि १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित असलेल्या बॉलिवूडच्या ‘८३’ या सिनेमातही ती झळकली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही