प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत घातपात झाला असावा, असे आपल्याला वाटत असून याबाबत आपण एक दिवस नक्की बोलणार असल्याचे मोठे वक्तव्य पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
रामदास कदम यांनी हवेत आरोप करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान पाटील यांनी दिले. सुनील तटकरे यांच्यावर कदम यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, तटकरे हे गेल्या ४० वर्षांपासून कोकणात काम करत असून त्यांनी शिवसेनेच्या विरोधात पक्ष रुजवण्याचे काम केले आहे. त्यामुळे कदम यांच्या आरोपांकडे स्थानिक पातळीवरील संघर्ष म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षात विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नसून या केवळ माध्यमांमधील बातम्या असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले. भविष्यात विलीनीकरणाची चर्चा होईल की नाही हे माहीत नाही, मात्र सद्यस्थितीत तसे काहीही नाही. तसेच, आमच्या गटाचे आमदार शरद पवारांना भेटायला जाणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे यांच्या विधानांबाबत बोलताना, त्यांचे आधीचे आणि आताचे बोलणे वेगळे असल्याने त्यांचे म्हणणे आता ‘न्यूट्रल’ झाल्याचे ते म्हणाले. शरद पवारांच्या पक्षाला जर एनडीएमध्ये यायचे असेल, तर त्यांना घ्यायचे की नाही हा निर्णय भाजपने ठरवायचा आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
यापूर्वी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तटकरे हे ए. आर. अंतुले यांचे पीए होते आणि त्यांनीच त्यांना संपवले, तसेच तटकरे यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा असून त्यासाठी ते काहीही करू शकतात, अशी टीका कदम यांनी केली होती. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे असल्याने अजित पवारांच्या घातपातामागे त्यांचाही हात होता का, या दिशेने तपास करण्याची मागणी कदम यांनी केली होती. मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण देत सुनील तटकरे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपण पत्रकार परिषद घेऊन यावर उत्तर देऊ, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२७: मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याची उणीव का भासणार नाही? आकाश चोप्रांनी स्पष्ट केले कारण
- काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक; सुनेत्रा पवार-सुनील तटकरेंच्या भेटीने नव्या समीकरणांची नांदी?
- अजितदादांचे आमदार शरद पवारांना भेटणार? बुधवारी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







