अजितदादांचे आमदार शरद पवारांना भेटणार? बुधवारी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती

राज्याच्या राजकारणात ऐन दिवाळीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजितदादा गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published On: 

Parth Pawar meets Sharad Pawar

प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: राज्याच्या राजकारणात ऐन दिवाळीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांनी बुधवारी भेटण्याची इच्छा व्यक्त करत संवादाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा चालली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याचे चित्र असून पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चाही सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठोपाठ आता अजितदादांचे आमदारही शरद पवारांची भेट घेणार आहेत.

आमदारांनी भेटीसाठी वेळ मागण्याआधीच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार सध्या मुंबईतच आहेत. ते पुढील काही दिवस त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आराम करणार असल्याची माहिती पवार कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही