छत्रपती संभाजीनगर, ३१ ऑक्टोबर: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील ५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) या बदल्यांचे आदेश जारी केले. यात पोलीस निरीक्षक राजू तडवी यांची बिडकीन पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. राजू तडवी यांच्यासह नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे आणि विनोद वाघ यांचीही बिडकीन पोलीस ठाण्यात नेमणूक झाली आहे. तसेच, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे यांची सोयगाव पोलीस ठाण्यात, तर सिल्लोड शहरचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांची पिशोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, बिडकीन पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना तात्काळ नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्काळ हजर होऊन तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना थेट मदत; पाणीटंचाईग्रस्त तुळशी गावाला दिला ५० लाखांचा धनादेश
- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी
- पुर्णेकर प्रकरणावर बोलणे टाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून इंडिया आघाडीवर घणाघात
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








