ये थांब… ये थांब…; वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलच्या ऑडिओ क्लिपने खळबळ, महिलेला दिल्या घाणेरड्या शिव्या

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने एका महिलेला फोनवर घाणेरड्या शिव्या देत धमकी दिल्याचा कथित ऑडिओ व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

Published On: 

Sushil Karad booked in molestation and assault case in Solapur

सोलापूर, 1 नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. आता त्याचा मुलगा सुशील कराड याच्यावर गंभीर आरोप झाले असून त्याच्या एका कथित ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये सुशील एका पीडित महिलेला फोनवरून घाणेरड्या शिव्या आणि धमकी देताना ऐकायला मिळत आहे. (या ऑडिओ क्लिपची पुष्टी नाही)

सुशील कराडवर कालच एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर लगेचच ही नवीन ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा मुलगाही आता गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या व्हायरल ऑडिओमध्ये सुशीलने फोन करून महिलेला, “मी सुशील बोलतोय, तुमचं अण्णांसोबत (वाल्मिक कराड) काय बोलणं झालं? आमचा व्यवहार तसंच ठेवून अण्णांनी तुम्हाला परळी सोडून जा म्हटले का?” अशी विचारणा केली. त्यावर महिलेने अण्णांनी परळी सोडून जाण्यास सांगितल्याचे मान्य केले. त्यानंतर दोघांमध्ये कानाच्या ऑपरेशनवरून शाब्दिक वाद झाल्याचे संभाषणात ऐकू येते. अण्णांनी कानाचे ऑपरेशन करून परत येण्यास सांगितले होते, असा दावा सुशील करत होता; तर महिलेने तिला केवळ ‘जा’ म्हटले होते, असे स्पष्ट केले.

याच चर्चेदरम्यान सुशीलचा संयम सुटला आणि त्याने “ये थांब ये थांब…” म्हणत महिलेवर अरेरावी सुरू केली. पीडित महिलेने “नीट बोलायचं मला दादा” असे बजावले असता, सुशीलने तिला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या. शेवटी महिलेनेही संतापून “थांब थांब, बघते तुला थांब” असा इशारा दिल्याचे या संभाषणात रेकॉर्ड झाले आहे. या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू असून पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही