शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा

शेअर बाजारात रोज २०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात असून, सेबीने नागरिकांना याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 25 ऑक्टोबर: शेअर बाजारात एका रात्रीत श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या आहेत. ‘इन्व्हाइट-ओन्ली’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून १०० टक्के खात्रीशीर इनसाइडर कॉल, मोफत शेअर बाजार प्रशिक्षण आणि रोज २०० टक्के नफ्याचे दावे करत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जात आहे. या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बाजार नियामक ‘सेबी’ने (SEBI) नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे.

सेबीने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी मोबाईल क्रमांकांवरून चालणाऱ्या या ग्रुप्समध्ये गुंतवणूकदारांना अडकवण्यासाठी ‘ॲस्ट्रोटर्फिंग’ (Astroturfing) नावाच्या तंत्राचा वापर केला जातो. यामध्ये फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटचेच लोक बनावट नफ्याचे स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकतात आणि ॲडमिनची खोटी स्तुती करतात. आपण दिलेल्या टिप्समुळे लाखो रुपये मिळत असल्याचे भासवून लोकांचा विश्वास जिंकला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला विशिष्ट शेअर्स खरेदी करण्यास, एखाद्या ॲपवर ट्रेडिंग खाते उघडण्यास किंवा अनोळखी खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले जाते.

सेबी किंवा सायबर सेलच्या कारवाईनंतर एखादा ग्रुप ब्लॉक झाल्यास, हे भामटे तत्काळ दुसरा ग्रुप बनवतात. ‘सोशल मीडियाच्या जोखीम नियंत्रण नियमांमुळे जुना ग्रुप बंद झाला असून, दर्जेदार शेअर टिप्ससाठी नव्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा,’ असा मेसेज नव्या क्रमांकावरून पाठवला जातो. सेबीने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारची लिंक येणे हा थेट धोक्याचा इशारा (Red Flag) असून, नागरिकांनी तातडीने अशा ग्रुपमधून बाहेर पडावे.

याशिवाय, अशा ग्रुप्समध्ये सांगण्यात आलेल्या कोणत्याही विनानोंदणीकृत थर्ड-पार्टी ट्रेडिंग ॲप किंवा प्लॅटफॉर्मवर आपले डीमॅट खाते उघडू नये, तसेच अनोळखी खात्यावर पैसे पाठवू नयेत, असे आवाहन सेबीने केले आहे. शेअर बाजारातील कोणतेही व्यवहार केवळ सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या ब्रोकर आणि मध्यस्थांमार्फतच करावेत. कोणत्याही तज्ज्ञाची किंवा वित्तीय संस्थेची सत्यता पडताळायची असल्यास सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर (sebi.gov.in) त्यांची नोंदणी तपासून खात्री करावी, असा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

हे ग्रुप्स १०० टक्के खात्रीशीर इनसाइडर कॉल, मोफत शेअर बाजार प्रशिक्षण आणि रोज २०० टक्के नफ्याचे दावे करून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढतात.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही