प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने (Tilak Varma) टी-२० क्रिकेटमध्ये एक अप्रतिम विक्रम नोंदवला आहे. ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. टी-२० क्रिकेटमध्ये तिलक २६ वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना (चेस) मैदानात उतरला असून, या सर्व २६ सामन्यांमध्ये त्याच्या संघाला विजय मिळाला आहे.
या विक्रमाची सर्वात खास बाब म्हणजे या २६ पैकी तब्बल २० सामन्यांमध्ये तिलक नाबाद राहिला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना दबावाच्या परिस्थितीत त्याची ही आकडेवारी पाहून त्याला आता भारताचा नवा ‘चेसमास्टर’ म्हटले जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याने आपली ही उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी मैदानात आलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या २६ चेंडूत नाबाद ५१ धावांची तडाखेबंद खेळी करत अखेरच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यात फलंदाजीपूर्वी क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल टिपले होते. तिलकच्या या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘भाजपचे निवडणुकीचे फंडे उघड झाले’
- एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना जरांगेंवर न बोलण्याच्या सूचना; महायुतीतील तणावानंतर हालचाली
- पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला येणार, ई-केवायसी नसल्यास अडकणार पैसे
Quick Answers
टि-२० क्रिकेटमध्ये तिलक वर्मा २६ वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरला असून, या सर्व २६ सामन्यांमध्ये त्याच्या संघाला विजय मिळाला आहे. या २६ पैकी २० सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्माने अवघ्या २६ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली.
भारताने १८१ धावांचे लक्ष्य गाठत हा सामना ४ गडी राखून जिंकला. या विजयामुळे भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








