प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडून आपल्याला देण्यासाठी ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता जरांगे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मोठी मागणी केली आहे.
जरांगे पाटील यांनी मीडियासमोर थेट एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली होती. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांचा आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्याकडून मिळाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे फायद्याचे ठरतील की नाही, यावर चर्चा सुरू असल्याचे यात ऐकू येते.
या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीतील नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून या क्लिपची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मंत्री उदय सामंत यांनी तर या क्लिपमधील आवाज भाजपा नेत्यांचा असल्याचे सांगत थेट चौकशीची मागणी केली आहे.
या सर्व घडामोडींनंतर मनोज जरांगे यांनी मोठे विधान केले आहे. “याच्या मुळाशी जाणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला एसआयटीपासून सीआयडीपर्यंत ज्या यंत्रणा लावता येतील त्या लावा, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा छडा लावला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. केवळ निवेदने देऊन चालणार नाही, तर खरे काय आहे ते पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.
तसेच, सत्तेचा दुरुपयोग केल्यास यातून काहीच निष्पन्न होणार नाही, त्यामुळे पळवाटा शोधू नका, असा इशारा त्यांनी दिला. हा विषय अतिशय गंभीर असून यात एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव आहे. त्यामुळे भाजपा किंवा शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांनी केवळ आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी बोलू नये, तर या प्रकरणाच्या मुळाशी जावे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीत गोकुळसारखा धक्कादायक निकाल का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
- सर्वात वेगवान द्विशतकासह हॅरी ब्रूकने रचला इतिहास; शुभमन गिलचा विक्रम मोडला
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी बांगलादेशचा १५ सदस्यीय संघ जाहीर; तस्किन अहमदचे पुनरागमन
Quick Answers
एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडून मनोज जरांगे यांना देण्यासाठी ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता.
या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांचा आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्याकडून मिळाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फायद्याचे ठरतील की नाही, यावर चर्चा सुरू असल्याचे यात ऐकू येते.
मंत्री उदय सामंत यांनी या क्लिपमधील आवाज भाजपा नेत्यांचा असल्याचे सांगत या प्रकरणाची थेट चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांनी याच्या मुळाशी जाण्यासाठी एसआयटीपासून सीआयडीपर्यंत ज्या यंत्रणा लावता येतील त्या लावाव्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








