पुणे, 23 ऑक्टोबर: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी कोथरूड येथील दीनदयाळ उपाध्याय शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील पाचही जागा महायुती जिंकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत गोकुळच्या निवडणुकीप्रमाणे धक्कादायक निकाल का लागणार नाही, याचे कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विजयाचा विश्वास व्यक्त करताना मोहोळ म्हणाले की, “हा सुशिक्षित आणि विचारी मतदार आहे. समाजात, देशात आणि जागतिक पातळीवर काय घडामोडी सुरू आहेत, याची त्याला अचूक माहिती असते. राज्याच्या विकासाचा वेग आणि देशाची प्रगती पाहून हा मतदार विकासाला आणि विचाराला मतदान करतो.” देशाचे आणि राज्याचे भवितव्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील, याचा विचार करूनच हे मतदार मतदान करतात असेही ते म्हणाले. मागच्या निवडणुकांचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत असून नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे.
गोकुळ निवडणुकीच्या निकालाबाबत तुलना करताना मोहोळ यांनी स्पष्ट केले की, सहकार क्षेत्रातील निवडणूक आणि ही निवडणूक यात मोठा फरक आहे. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे निश्चितपणे विजयी होतील, असा शतप्रतिशत विश्वास त्यांनी व्यक्त केला. वय आणि अनुभव पाहता गावडे नक्की जिंकतील, असेही ते म्हणाले. शिक्षक मतदारसंघात काही ठिकाणी पक्ष नेतृत्वाने मैत्रीपूर्ण लढती स्वीकारल्या असल्या, तरी युतीला मानणारा मतदार हा भाजपसोबतच राहील, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज (२३ ऑक्टोबर) विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडत आहे. पदवीधरच्या तीन आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन अशा एकूण पाच जागांसाठी तब्बल १८२ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीमधील बंडखोरी आणि अंतर्गत नाराजीमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, तर महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतींमुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधरसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिममध्ये मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच, नागपूर पदवीधरसाठी नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात मतदान पार पडत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताचे टी-२० मधील सर्वोच्च ५ यशस्वी रन-चेस: न्यूझीलंडविरुद्ध रचला विक्रम
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर संजू सॅमसनचे सोशल मीडियावरील टीकेबाबत मोठे विधान
- दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, दुसऱ्या कसोटीनंतर कशी आहे ‘WTC’ गुणतालिका?
Quick Answers
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड येथील दीनदयाळ उपाध्याय शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला.
मोहोळ यांच्या मते, सहकार क्षेत्रातील निवडणूक आणि ही निवडणूक यात मोठा फरक आहे. हा मतदार सुशिक्षित आणि विचारी असून तो विकासाचा वेग, देशाची प्रगती आणि सुरक्षित भवितव्याचा विचार करून विकासाला व विचाराला मतदान करतो.
पदवीधरच्या तीन आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन अशा एकूण पाच जागांसाठी तब्बल १८२ उमेदवार रिंगणात आहेत.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








