नागपूर पदवीधर निवडणूक: मतदारांकडून कोऱ्या कागदावर लिहून घेतलं जातंय घोषणापत्र, दुबार नावांमुळे मोठा गोंधळ

नागपूर पदवीधर निवडणुकीत दुबार नावांचा मुद्दा तापला आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांकडून निवडणूक यंत्रणा कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेत आहे.

Published On: 

MHD LOGO

नागपूर, 23 ऑक्टोबर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदार यादीत एकापेक्षा अधिक वेळा नाव असलेल्या मतदारांकडून निवडणूक यंत्रणेकडून चक्क कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतले जात आहे. ‘मी उपस्थित असलेल्या ठिकाणी मतदान करतो आहे, दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही’, असा चार ते पाच ओळींचा मजकूर या मतदारांकडून लिहून घेतला जात आहे.

मतदार यादीमध्ये तब्बल ८,७४४ नावे दुबार असल्याचा आक्षेप घेत काँग्रेसने गुरुवारी विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. या पत्राद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती. काँग्रेसच्या याच तक्रारीनंतर आता निवडणूक यंत्रणेने दुबार नावे असलेल्या मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याबाबतचे घोषणापत्र लिहून घेण्यास सुरुवात केल्याची चर्चा मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या काही मतदारांमध्ये आहे.

या सर्व गोंधळावर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मतदार यादीत स्वतः आपल्या नावासह ८,५०० जणांची नावे दुबार असल्याचा खळबळजनक आरोप वंजारी यांनी केला आहे. त्याचवेळी, काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

शुक्रवारी मतदान प्रकिया सुरू असतानाच अतुल लोंढे यांनी दावा केला की, एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला याबाबत वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगत, ‘निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे का?’, असा थेट सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, प्रफुल्ल गुडधे यांनीही विभागीय आयुक्तांना पत्र लिहून या सर्व प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. अंतिम मतदार यादीतील ८,७४४ दुबार मतदारांची नावे एकाच किंवा एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर असल्याची बाब गंभीर असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाल्याचे गुडधे यांनी पत्रात म्हटले आहे. या नोंदींची तातडीने पडताळणी करून अतिरिक्त दुबार नोंदी वगळण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच, ‘५४३२१५४३२१’ या एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दाही गुडधे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच क्रमांकावरून नोंदणी कशी झाली, त्यासाठी कोणती कागदपत्रे व पडताळणी प्रक्रिया अवलंबिण्यात आली, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दुबार नावे असलेल्या मतदारांकडून 'मी उपस्थित असलेल्या ठिकाणी मतदान करतो आहे, दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही' असा चार ते पाच ओळींचा मजकूर कोऱ्या कागदावर लिहून घेतला जात आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही