प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या (२०२६) निवडणुकीतील मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणे आणि आपल्याला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण करणे, या कारणांवरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या कारवाईनंतर आपली भूमिका मांडताना नितेश कराळे भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, पक्षासाठी अनेक वर्षे काम केले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी अनेक सभा घेऊनही पक्षाने आपली साधी दखल घेतली नाही.
लोकशाही आणि आंदोलनांसाठी आपल्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाल्याचे सांगत कराळे यांनी आपली खंत बोलून दाखवली. शेतकरी आंदोलनावेळी २० गुन्हे दाखल झाले आणि ६-७ दिवस जेलमध्ये राहावे लागले. त्यावेळी लहान मुलगा वडिलांची आठवण काढत होता, पण एकाही मोठ्या नेत्याने फोन केला नाही. ‘मला नाही, पण किमान बायकोला तरी विचारपूस करायला हवी होती’, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
पक्षातून हकालपट्टी करणे हा आपण आपल्याला मिळालेला पुरस्कार समजतो, असा टोला कराळे यांनी लगावला. सर्व नेते आणि पक्षाने मिळून आपला गेम केल्याचा आरोप करत, ज्यांनी हे केले त्यांना स्पष्टीकरणासह उघड करणार असल्याचा आक्रमक इशारा त्यांनी दिला. या सगळ्या घडामोडींनंतरही जनतेचा आपल्याला मोठा पाठिंबा असून, ही निवडणूक एकतर्फी होईल आणि आपलाच मोठ्या मतांनी विजय होईल, असा विश्वास कराळे यांनी शेवटी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “त्यांना बरोबर माहीत आहे ते काय करतायत”: न्यूझीलंडविरुद्धच्या विक्रमी पाठलागानंतर श्रेयस अय्यरकडून फलंदाजांचे कौतुक
- अर्थखातं आम्हालाच मिळायला हवं; शाहांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका
- देशात गडबड करणारा जन्माला यायचाय, कोणी गडबड केली तर पाकिस्तानात जाऊन ठोकू: गुलाबराव पाटील
Quick Answers
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणे आणि आपल्याला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण करणे, या कारणांवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर भावूक झालेल्या कराळे यांनी पक्षातून हकालपट्टी करणे हा आपल्याला मिळालेला पुरस्कार समजतो, असा टोला लगावला. तसेच सर्व नेते आणि पक्षाने मिळून आपला गेम केल्याचा आरोप करत या निवडणुकीत आपलाच मोठ्या मतांनी विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








