प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निराशाजनक पुनरागमन केले आहे. गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तो फारशी छाप पाडू शकला नाही.
पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत तो खूपच महागडा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये १२.२० च्या इकॉनॉमी रेटने तब्बल ४९ धावा खर्च केल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची दुसरी सर्वात खराब गोलंदाजीची आकडेवारी ठरली आहे. तत्पूर्वी, भारतीय संघात पुनरागमन करताना त्याने एका विश्वविक्रमाचीही नोंद केली होती.
जवळपास चार वर्षांनंतर संघात परतलेल्या भुवनेश्वरची ही कामगिरी त्याच्या शेवटच्या टी-२० सामन्यापेक्षाही खराब होती. यापूर्वी त्याने आपला अखेरचा टी-२० सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. त्या सामन्यात त्याने ४ षटकांत ८.७५ च्या इकॉनॉमी रेटने ३५ धावा दिल्या होत्या आणि त्याला विकेट मिळाली नव्हती. दुर्दैवाने, या पुनरागमनाच्या सामन्यात भुवनेश्वरने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिला ‘नो-बॉल’ देखील टाकला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे चेअरमन; सतेज पाटलांनी पाळला शब्द
- ११० टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय टीम इंडियात परतणार नाही; हार्दिक पांड्याची मोठी अट
- गोकुळ निवडणूक: मुलाचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र, हसन मुश्रीफांचा महायुतीच्या नेत्यांवरच निशाणा
Quick Answers
भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ षटकांत १२.२० च्या इकॉनॉमी रेटने ४९ धावा दिल्या, आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
भुवनेश्वरने यापूर्वीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
या पुनरागमनाच्या सामन्यात भुवनेश्वरने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिला 'नो-बॉल' टाकला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








