दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटात मतभेद; राऊतांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर प्रियंका चतुर्वेदींचा थेट आक्षेप

संजय राऊत यांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, दसरा मेळाव्यापूर्वीच पक्षात मतभेद उघड झाले आहेत.

Published On: 

Sanjay Raut and Priyanka Chaturvedi statement controversy

दिल्ली, 20 ऑक्टोबर: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. खासदार संजय राऊत यांनी अल्बानियातील हिंसक आंदोलनाचा दाखला देत केलेल्या एका विधानाला पक्षाच्याच नेत्या आणि माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या देशातील विविध शहरांसह दिल्लीत विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून विविध कारणांवरून आंदोलने सुरू असून, ठाकरे गट यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. याच दरम्यान, संजय राऊत यांनी अल्बानियातील घटनेचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला. ‘अल्बानियात सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने भडकलेल्या लोकांनी ते जाळून टाकले. तसेच आंदोलकांनी संसद, सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले केले. सर्व देशांनी या घटनांमधून धडा घ्यायला हवा,’ असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

यावर दिल्लीत प्रतिक्रिया देताना प्रियंका चतुर्वेदी यांनी राऊतांची भूमिका खोडून काढली. भारताला इतर कोणत्याही देशाकडून शिकण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. भारतात सत्तांतर नेहमीच लोकशाही मार्गाने झाले असून आणीबाणीनंतरही तोच मार्ग अवलंबला गेला. त्यामुळे भारतातील जनतेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, ‘अल्बानिया हा एक छोटा देश असून तिथे अनेक वर्षे डाव्यांची हुकूमशाही होती. लोकांनी कायदा हातात घेऊन सर्वोच्च न्यायालय किंवा संसदेसारख्या संस्था अस्थिर करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.’ बांगलादेशातील आंदोलनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, तिथे सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मात्र नंतर ते इस्लामी चळवळीने ताब्यात घेतले. ज्यातून हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले झाले. त्यामुळे बांगलादेशातील आंदोलनातून सत्तांतराची प्रेरणा घ्यावी, असे म्हणणे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंसक मार्गाने होणाऱ्या सत्तांतराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नसून अल्बानिया, पॅरिस किंवा अशा इतर उदाहरणांकडे आपण मार्गदर्शनासाठी पाहू नये, असेही प्रियंका चतुर्वेदींनी बजावले. त्यांच्या या सडेतोड वक्तव्यानंतर आता खासदार संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अल्बानियात सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने भडकलेल्या लोकांनी ते जाळून टाकले तसेच संसद, सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले, असे सांगत सर्व देशांनी या घटनांमधून धडा घ्यायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही