बीड, 20 ऑक्टोबर: बीड येथील नारायण गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये घरोघरी ‘मराठा सेवक’ तयार करणे, कुणबी प्रमाणपत्र नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणे आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मेळाव्याला उपस्थित हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संघर्षावर भाष्य केले. गेल्या तीन वर्षांपासून समाज संघर्ष करत असून समाजाची लेकरंबाळं महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही पक्षातील मराठा नेत्यावर संकट आल्यास समाज त्याला पाठीशी घालतो, मात्र समाजाने साथ सोडल्यास या नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, असे ते म्हणाले. राज्यातील मराठा समाज मोठा व्हावा यासाठीच आपली ही झुंज आणि आक्रोश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या पहिल्या घोषणेची माहिती देताना ते म्हणाले की, विजयादशमीनंतर घरोघरी ‘मराठा सेवक’ तयार करण्यात येतील. ज्यांना मराठा सेवक व्हायचे आहे त्यांच्यासाठी येत्या २२ तारखेला एक मोबाईल क्रमांक दिला जाईल. या क्रमांकावर फोन न करता केवळ आपले नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवून नोंदणी करायची आहे. मराठा समाज या सेवकांसाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले.
दुसरी घोषणा कुणबी नोंदी आणि एसईबीसी (SEBC) आरक्षणाशी संबंधित आहे. कुणबी नोंदी सापडूनही अनेक ठिकाणी प्रशासनाकडून अर्ज स्वीकारले जात नाहीत, प्रमाणपत्रे किंवा व्हॅलिडिटी दिली जात नाही. यावर मार्ग काढण्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक दिला जाणार असून, त्यावर केवळ आरक्षणासंदर्भातील अडचणी पाठवायच्या आहेत. “कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही ते बघतोच आम्ही,” असा थेट इशाराच त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे, समाजाच्या इतर सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आणखी एक मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. यावरही कुणीही फोन न करता केवळ आपल्या समस्या नोंदवायच्या आहेत, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना २०२९ ला पाडणार; नारायणगडावरून मनोज जरांगेंचा इशारा
- बीडच्या नारायण गडावरून मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचाही उल्लेख
- दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटात मतभेद; राऊतांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर प्रियंका चतुर्वेदींचा थेट आक्षेप
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी घरोघरी 'मराठा सेवक' तयार करणे, कुणबी प्रमाणपत्र नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणे आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करणे अशा तीन मोठ्या घोषणा केल्या.
मराठा सेवक होण्यासाठी २२ तारखेला एक मोबाईल क्रमांक दिला जाईल, ज्यावर फोन न करता केवळ आपले नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवून नोंदणी करायची आहे.
कुणबी नोंदी सापडूनही अर्ज न स्वीकारणाऱ्या किंवा प्रमाणपत्रे न देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र क्रमांक दिला जाईल, असे सांगत "कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही ते बघतोच आम्ही," असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
समाजाच्या इतर सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आणखी एक मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यावर फोन न करता केवळ समस्या नोंदवायच्या आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








