बीड, 20 ऑक्टोबर: मराठा समाजाच्या विरोधात जाणारा जो कोणताही नेता किंवा पक्ष असेल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत निवडून येऊ द्यायचे नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ‘२०२९ साठी सगळे तयार आहेत का?’ असा सवाल करत त्यांनी मराठा बांधवांना साद घातली.
गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज संघर्ष करत असून ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता लोक झटत आहेत, याची आठवण जरांगे यांनी करून दिली. पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी लोकांचा जीव जात आहे. कोणत्याही पक्षातील मराठा नेत्यावर संकट आले, तर समाज त्यांच्यावर पांघरूण घालतो, याचे भान नेत्यांनीही ठेवायला हवे, असे खडेबोल त्यांनी सुनावले. तसेच समाजावर दुष्काळाचे सावट असताना नेत्यांचा उदो उदो करणे आणि त्यांच्यावरील प्रेम आता थांबवा, असे आवाहनही त्यांनी केले.
कुणबी नोंदी सापडूनही अधिकाऱ्यांकडून अर्ज न स्वीकारणे, प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी न देणे तसेच एसईबीसीचे आरक्षण नाकारले जात असल्याबद्दल जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, ते आता बघतोच’, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला. आपण शब्दाला पक्के असून सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीपैकी आता एक महिना उलटून गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
राज्यात आणखी दोन महिन्यांनी दुष्काळाची परिस्थिती अधिक भयानक होईल, अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीचे गणित मांडताना ते म्हणाले की, हे पैसे मिळवण्यासाठी आठ दिवस हेलपाटे मारावे लागतात. यात २ हजार रुपये पेट्रोलला आणि ३२०० रुपये जेवणालाच खर्च होतात. ‘जीएसटी आपण भरायचा आणि बंगले यांचे मोठे होणार’, असा टोला लगावत त्यांनी शेतकऱ्यांना संकटकाळात एकमेकांना पाणी देऊन मदत करण्याचे आवाहन केले.
शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलावणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रमुख पाच मागण्या मांडल्या:
१) शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी
२) संपूर्ण कर्जमाफी करावी
३) पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत
४) रखडलेले सर्व अनुदान मिळावे
५) गावोगावी चारा छावण्या उभारण्यात याव्यात.
गेल्या तीन वर्षांत आपल्या जवळचे किंवा लांबचे लोक पैसे घेत असल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मला भेटायला पैसे लागत नाहीत. कोणी माझ्या नावावर पैसे मागत असेल आणि ते मला समजले तर मी त्यांना सोडणार नाही’, असा सक्त इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने खळबळ; शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या; नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ५ प्रमुख मागण्या
- मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
Quick Answers
मराठा समाजाच्या विरोधात जाणारा जो कोणताही नेता किंवा पक्ष असेल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत निवडून येऊ द्यायचे नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे, संपूर्ण कर्जमाफी करणे, पीक विम्याचे पैसे थेट खात्यात जमा करणे, रखडलेले सर्व अनुदान देणे आणि गावोगावी चारा छावण्या उभारणे या पाच प्रमुख मागण्या मांडल्या.
कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी अर्ज स्वीकारत नसल्याबद्दल आणि प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी न देत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला; तसेच 'कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, ते आता बघतोच', असा थेट इशारा सरकारला दिला.
आपल्याला भेटायला पैसे लागत नाहीत असे सांगून, जर कोणी त्यांच्या नावावर पैसे मागत असल्याचे समजले तर त्यांना सोडणार नाही, असा सक्त इशारा त्यांनी दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








