बीड, 20 ऑक्टोबर: बीड येथील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी दोन खळबळजनक दावे केले आहेत. आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असून, त्याचे भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचेही ते म्हणाले.
आपल्याला संपवण्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेली ३० ते ४० मिनिटांची एक गुप्त चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “जरांगेंना कसं मारायचं, यावर त्यामध्ये चर्चा झाली आहे. यात एका माजी मुख्यमंत्र्यांचे नाव असून, हे माजी मुख्यमंत्री ‘बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे’ असे म्हणायचे,” असे जरांगे म्हणाले. या चर्चेतील एका भयंकर वक्तव्याचा संदर्भ देत, संबंधित नेत्याने ते ऐकल्यास तो उद्याच पक्ष सोडेल, इतकी ती भयंकर कमेंट असल्याचे त्यांनी सांगितले.
५०० कोटींच्या आरोपावर बोलताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले, ते श्रीकांत शिंदे यांना दिले आणि त्यानंतर ते मला देण्यात आले, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना हे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. “मला हे पैसे मिळाले असते तर मी ते दुष्काळात वाटले असते. मला या आरोपाचा छडा लावायचा असून, कोण कुणाचा गेम करतंय हे मला पाहायचं आहे,” असे ते म्हणाले. शिंदेंनी पैसे घेतले असतील तर सांगावे, नसतील तर भाजप आपल्याला की शिंदेंना संपवू पाहत आहे, याच्या मुळाशी जायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार आपल्या विरोधात कॅबिनेट बैठका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबत किंवा आरक्षणाबाबत चर्चा न होता, वेगळीच भूमिका मांडली गेली. “आपल्याच समाजातील नेत्यांनी बैठकीत सांगितले की, जे देता येते तेच द्या आणि जे देता येत नाही त्याला थेट नाही म्हणून सांगा,” अशी माहिती जरांगे यांनी दिली. असाच प्रकार राहिल्यास उद्या हे लोक एसीबीसी, कुणबी प्रमाणपत्र आणि शेतकऱ्यांच्या मदतीलाही नकार देतील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरून ‘मास्टरप्लॅन’; मराठा समाजासाठी तीन संपर्क क्रमांक जाहीर
- गोकुळ निवडणूक २०२६: सतेज पाटलांनी उलगडली महायुतीच्या १३-१२ पराभवाची ‘A टू Z’ कारणे
- उत्तराखंडविरुद्ध साई किशोरची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; १० बळी घेत उडवला धुव्वा
Quick Answers
आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असून त्याचे भक्कम पुरावे असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच, ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
आपल्याला संपवण्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेली ३० ते ४० मिनिटांची गुप्त चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असून, त्यात जरांगेंना कसे मारायचे यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या चर्चेत 'बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे' असे म्हणणाऱ्या एका माजी मुख्यमंत्र्यांचे नाव असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले, ते श्रीकांत शिंदे यांना दिले आणि नंतर ते आपल्याला देण्यात आले, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. तसेच, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना हे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबत किंवा आरक्षणाबाबत चर्चा न होता वेगळीच भूमिका मांडली गेली, असा आरोप त्यांनी केला. बैठकीत आपल्याच समाजातील नेत्यांनी 'जे देता येते तेच द्या आणि जे देता येत नाही त्याला थेट नाही सांगा' असे म्हटल्याची माहिती त्यांनी दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








