मुंबई, 20 ऑक्टोबर: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
नेस्को सेंटरवरील सभेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शिवसैनिकांनी गावखेड्यातून लांबचा प्रवास करून सभेला येऊ नये, तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या मेळाव्यासाठी केवळ मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड येथील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दुसरीकडे, ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून, तिथे सभेची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. दरम्यान, यंदाच्या मेळाव्याचा टीझर आणि पोस्टर समोर आले असून, त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावर केवळ आमदार आदित्य ठाकरे यांचा आंदोलनातील फोटो लावण्यात आला आहे.
या पोस्टरवर 'यंदाचा दसरा मेळावा संविधान रक्षणार्थ' अशी महत्त्वाची टॅगलाईन देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनांमध्ये ठाकरे यांनीही सहभाग नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे सर्वांचे लक्ष आता दसरा मेळाव्याकडे लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ दूध संघ निवडणूक: मतमोजणी रखडल्याने संशय; अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप
- दसऱ्यापूर्वी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये करा हे फेशियल
- अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
Quick Answers
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
शिवसैनिकांनी गावखेड्यातून लांबचा प्रवास करून न येता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच केवळ मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड येथील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आदेश त्यांनी दिले आहेत.
या मेळाव्याच्या पोस्टरवर 'यंदाचा दसरा मेळावा संविधान रक्षणार्थ' अशी महत्त्वाची टॅगलाईन देण्यात आली आहे.
या पोस्टरवर केवळ आमदार आदित्य ठाकरे यांचा आंदोलनातील फोटो लावण्यात आला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







