प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ सण मानला जातो. या सणाच्या दिवशी आपट्याची पानं ‘सोनं’ म्हणून एकमेकांना देण्याची पूर्वापार परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते. या परंपरेमागे एक अत्यंत रंजक पौराणिक आख्यायिका आहे.
महाकवी कालिदासांच्या ‘रघुवंश’ या काव्यात वर्णन केलेल्या दानशूर रघुराजाच्या कथेशी आपट्याची पानं वाटण्याची प्रथा जोडली गेली आहे. पैठण येथील देवदत्त नावाच्या विद्वानाचा मुलगा कौत्स याने वरतंतु ऋषींकडून चौदा विद्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण संपल्यानंतर कौत्साने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. तेव्हा वरतंतु ऋषींनी त्याच्याकडे तब्बल चौदा कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली.
गुरुदक्षिणेची व्यवस्था करण्यासाठी कौत्साने थेट दानशूर रघुराजाकडे धाव घेतली. मात्र, विश्वजीत यज्ञानंतर राजाने आपली सर्व संपत्ती दान केली असल्याने त्याच्याकडेही धन शिल्लक नव्हते. तरीही कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजाने धनसंपत्तीचा देव असलेल्या कुबेरावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. हे युद्ध टाळण्यासाठी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केल्याचे आख्यायिकेत म्हटले आहे.
या सुवर्णवृष्टीतून कौत्साने आपल्या गुरूंच्या मागणीनुसार केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि उर्वरित सोने स्वीकारण्यास नकार दिला. आख्यायिकेनुसार, हे उरलेले सोने आपटा आणि शमीच्या झाडांखाली ठेवण्यात आले. त्यानंतर कौत्साने लोकांना हे उरलेले सोने घरी घेऊन जाण्यास सांगितले. याच कथेवरून दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.
आजही दसऱ्याच्या (Dussehra 2026) दिवशी नागरिक एकमेकांना आपट्याची पानं देऊन “सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा” अशा शुभेच्छा देतात. हे पान केवळ सुवर्णाचे प्रतीक नसून, त्यातून समृद्धी, ज्ञान, सद्भावना तसेच सद्गुण आणि स्नेह जपण्याचा सुंदर संदेश दिला जातो.
📌 महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतर आंदोलन प्रकरण: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सौरव दास, आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
- गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांची बाजी, पण निकाल फिरवण्याच्या प्रयत्नांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
- मका साठेबाजांवर करडी नजर ठेवणार, पोल्ट्री उद्योगालाही दिलासा देणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Quick Answers
दसऱ्याला आपट्याची पानं वाटण्याची प्रथा महाकवी कालिदासांच्या 'रघुवंश' या काव्यात वर्णन केलेल्या दानशूर रघुराजाच्या कथेशी जोडली गेली आहे.
वरतंतु ऋषींनी कौत्साकडे तब्बल चौदा कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली होती.
विश्वजीत यज्ञानंतर सर्व संपत्ती दान झाल्याने धन शिल्लक नसताना, कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजाने धनसंपत्तीचा देव असलेल्या कुबेरावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला.
कौत्साने केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेतल्यावर उर्वरित सोने आपटा आणि शमीच्या झाडांखाली ठेवण्यात आले आणि कौत्साने लोकांना ते सोने घरी घेऊन जाण्यास सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







