मुंबई, 20 ऑक्टोबर: अनेकांना रात्री झोपेत असताना किंवा सकाळी उठल्यावर अचानक हात सुन्न होण्याची आणि बोटांना मुंग्या येण्याची समस्या जाणवते. हात हलवल्यास किंवा झोपण्याची स्थिती बदलून पुन्हा झोप लागल्यास हा सुन्नपणा कमी होतो. मात्र, हा प्रकार वारंवार घडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते, कारण नसांवर सातत्याने दबाव पडल्यास यातून गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
हाताला मुंग्या येण्याचे किंवा सुन्नपणा जाणवण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या स्थितीत झोपणे होय. डोक्याखाली हात ठेवून झोपल्यास, शरीराखाली हात दाबला गेल्यास किंवा एकाच कुशीवर झोपल्यास नसांवर ताण येतो. दीर्घकाळ एकाच स्थितीत राहिल्यामुळे तसेच झोपताना कोपर जास्त वेळ वाकवून ठेवल्यानेही मज्जातंतूंवर दबाव येऊन हाताला मुंग्या येतात.
मनगटातील नसांवर दबाव आल्यास ‘कार्पल टनेल सिंड्रोम’ (Carpal Tunnel Syndrome) होण्याची शक्यता असते. यामुळे प्रामुख्याने अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटात वेदना किंवा मुंग्या येतात. रात्रीच्या वेळी ही लक्षणे अधिक तीव्र होऊन झोपमोडही होऊ शकते. याशिवाय, मानेतील हाडे किंवा डिस्कच्या समस्येमुळे मानेतून जाणाऱ्या मज्जातंतूंवर दाब पडल्यासही त्याचा परिणाम थेट हातावर दिसून येतो आणि वेदना जाणवतात.
शरीरातील काही कमतरता आणि आजारही या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास आणि मधुमेहाच्या आजारात मज्जातंतूंना इजा पोहोचू शकते. यामुळे हात किंवा पायांची जळजळ होणे, मुंग्या येणे आणि सुन्न पडणे अशी लक्षणे दिसून येतात.
जर हात वारंवार बधीर होत असतील, हा त्रास दीर्घकाळ टिकून राहत असेल किंवा हातांसोबत मानेतही वेदना होत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मात्र, हात अचानक सुन्न होण्यासोबतच चेहऱ्यावर किंवा शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवत असेल आणि बोलण्यात अडचण येत असेल, तर त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवणे गरजेचे आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतर आंदोलन प्रकरण: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सौरव दास, आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
- गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांची बाजी, पण निकाल फिरवण्याच्या प्रयत्नांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
- मका साठेबाजांवर करडी नजर ठेवणार, पोल्ट्री उद्योगालाही दिलासा देणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Quick Answers
हाताला मुंग्या येण्याचे किंवा सुन्नपणा जाणवण्याचे सर्वात प्रमुख कारण चुकीच्या स्थितीत झोपणे हे आहे. डोक्याखाली हात ठेवून झोपल्यास, शरीराखाली हात दाबला गेल्यास, एकाच कुशीवर झोपल्यास किंवा कोपर जास्त वेळ वाकवून ठेवल्याने नसांवर दबाव येतो.
मनगटातील नसांवर दबाव आल्यामुळे 'कार्पल टनेल सिंड्रोम' होण्याची शक्यता असते. या सिंड्रोममुळे प्रामुख्याने अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटात वेदना किंवा मुंग्या येतात.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास आणि मधुमेहाच्या आजारात मज्जातंतूंना इजा पोहोचू शकते, ज्यामुळे हात किंवा पायांची जळजळ होणे, मुंग्या येणे आणि सुन्न पडणे अशी लक्षणे दिसतात.
हात अचानक सुन्न होण्यासोबतच चेहऱ्यावर किंवा शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवत असेल आणि बोलण्यात अडचण येत असेल, तर त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवणे गरजेचे आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








