गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची बाजी; ऐनवेळी ट्विस्टसह १३ जागांवर विजय, महायुतीला १२ जागा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत सत्ता मिळवली. एका जागेवरील फेरमतमोजणीत महायुतीच्या अमर पाटलांचा विजय.

Published On: 

MHD LOGO

कोल्हापूर, 19 ऑक्टोबर: कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने बाजी मारली आहे. एकूण २५ जागांसाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळवली आहे. तर, संपूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या महायुतीच्या 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी'ला १२ जागांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणीदरम्यान एक नाट्यमय वळण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या कलांमध्ये सतेज पाटील यांचे १५ उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे गेली तसा हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा फेरमतमोजणी करण्यात आली, ज्यामध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे यांचा पराभव झाला आणि महायुतीचे अमर पाटील विजयी ठरले. यामुळे सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली असली, तरी गोकुळ चालवण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा जादुई आकडा त्यांनी गाठला आहे.

या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलकडून अभिजित प्रभाकर तायशेटे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, किसन बापूसो चौगले, बाबासाहेब श्रीपती चौगले, राहुल बजरंग देसाई, विद्याधर बाबुराव गुरबे, बाबासाहेब विष्णू देवकर, विश्वजीत दिनकरराव जाधव हे विजयी झाले. तसेच अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री धीरज डोंगळे, शशिकांत शामराव खोत, राजू बाबा आवळे आणि बयाजी शेळके यांनीही विजय मिळवला.

दुसरीकडे, महायुतीच्या पॅनेलचे राहुल पांडुरंग पाटील, चेतन अरुण नरके, अजित शशिकांत नरके, अंबरीषसिंह संजय घाटगे, विरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबुराव देसाई विजयी झाले आहेत. यासोबतच राजेश नरसिंगराव पाटील, रणजितसिंह दिलीपराव पाटील, रणजितसिंह कृष्णराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, कर्णसिह गायकवाड आणि अमर पाटील (कोडोली) यांनीही महायुतीकडून विजय नोंदवला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गोकुळ दूध संघाची निवडणूक एकूण २५ जागांसाठी झाली. यामध्ये सतेज पाटील यांच्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने १३ जागा जिंकून सत्ता मिळवली, तर महायुतीच्या 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी'ला १२ जागा मिळाल्या.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही