प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: प्रसिद्ध व्यावसायिक गुलशन कुमार यांच्या हत्येमागे गायिका अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील स्पर्धा हेदेखील एक कारण होतं, असा मोठा खुलासा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत निकम (Ujjwal Nikam) यांनी या हत्याकांडाबाबत अनेक महत्त्वाची माहिती उघड केली आहे.
या हत्येमागील कारणांवर बोलताना निकम म्हणाले की, आपापसातील आणि प्रोफेशनल वादातून गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात एका शूटरला अटकही झाली, मात्र त्यामागचे खरे मास्टरमाईंड समोर येऊ शकले नाहीत. तपासादरम्यान अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वाद हेदेखील या हत्येचं एक कारण असल्याचं समजल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, आता याबद्दल बोलून काही फायदा नाही कारण याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या हत्याकांडाच्या कटात नाव आल्यानंतर इंग्लंडला पळून गेलेला संगीतकार नदीम सैफी याच्याबद्दलही निकम यांनी भाष्य केले. एका जुन्या मुलाखतीत निकम यांनी नदीमला या हत्येचा मास्टरमाईंड म्हटले होते. आता त्यांनी सांगितले की, नदीम भारतात येण्यास तयार होता, पण तो आला नाही. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. तसेच, भारतीय कायद्यानुसार मृत्यू्पूर्व जबाबाला (डायिंग डिक्लेरेशन) सत्य मानले जाते, मात्र परदेशी न्यायालयांनी त्यांच्या कायद्यानुसार पुरावे तपासले आणि गुलशन कुमार प्रकरणात त्यांनी याला मान्यता दिली नाही, असेही निकम शेवटी म्हणाले.
१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. अबू सालेमने त्यांच्याकडे दरमहा ५ लाख रुपयांची मागणी केली होती. गुलशन कुमार यांनी यास नकार दिल्याने संतापलेल्या सालेमने आपला मारेकरी ‘राजा’ याच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणली. गुलशन कुमार दर्शनासाठी जात असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ १६ गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या ड्रायव्हरवरही गोळ्या झाडण्यात आल्या. रुग्णालयात नेत असताना वाटेतच गुलशन कुमार यांचा मृत्यू झाला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट: फेरमतमोजणीत आकडे फिरले, सतेज पाटलांना धक्का मात्र सत्ता निश्चित
- रणजी करंडक: सरफराज खान आणि रजत पाटीदारचा धमाका, झळकावली शानदार शतके
- राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी
Quick Answers
गुलशन कुमार यांच्या हत्येमागे आपापसातील आणि प्रोफेशनल वाद, तसेच गायिका अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील स्पर्धा हेदेखील एक कारण होतं, असा खुलासा उज्ज्वल निकम यांनी केला. मात्र, याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
हत्याकांडाच्या कटात नाव आल्यानंतर इंग्लंडला गेलेला नदीम सैफी भारतात येण्यास तयार होता, पण तो आला नाही. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू असल्याचे निकम यांनी सांगितले.
१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर ही हत्या झाली. मंदिरात दर्शनासाठी जात असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ १६ गोळ्या झाडल्या, ज्यामुळे रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडे दरमहा ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला नकार दिल्याने संतापलेल्या सालेमने आपला मारेकरी 'राजा' याच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








