मुंबई, 19 ऑक्टोबर: मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा ९० च्या दशकातील अंडरवर्ल्डच्या दहशतीची आठवण करून देणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. पारंपरिक माफियांची जागा आता एका नव्या गुन्हेगारी सिंडिकेटने घेतली असून, हे नेटवर्क तुरुंगाच्या चार भिंतीआडूनही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. आता या गँगचे टार्गेट केवळ सुपरस्टार सलमान खानपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तीही त्यांच्या रडारवर आहेत.
या घटनांच्या साखळीतील सर्वांत ताजी घटना रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. मुंबईतील जुहू परिसरात संध्याकाळी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यातून टायगर बचावला असला तरी त्याचा चालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सलमान खानशी व्यावसायिक किंवा जवळचे संबंध असणारी प्रत्येक व्यक्ती या टोळीच्या निशाण्यावर आहे.
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी सलमान खान आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजाच्या नाराजीतून तो अनेक वर्षांपासून गँगच्या रडारवर आहे. १४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. तेव्हापासून सलमानला उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
याच गुन्हेगारी नेटवर्कने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठी घटना घडवून आणली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध नसला तरी, सलमान खानसोबतच्या त्यांच्या जवळिकीमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. या हत्येची जबाबदारीही गँगशी संबंधित नेटवर्कने स्वीकारली होती, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
ऑक्टोबर २०२४ मध्येच स्टँड-अप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस’ विजेता मुनव्वर फारुकी यालाही संभाव्य धोक्यांचा सामना करावा लागल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या माहितीतून आणि मीडिया रिपोर्ट्समधून स्पष्ट झाले. दिल्लीतही त्याला टार्गेट केले जाण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली होती.
या गँगची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. २०२५ मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माशी संबंधित असलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर सलग गोळीबाराच्या घटना घडल्या. प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याचा संबंधही याच गुन्हेगारी नेटवर्कशी आणि सलमान खानच्या संपर्कांशी जोडला होता.
फेब्रुवारी २०२६ मध्ये बॉलिवूडमधील आणखी दोन दिग्गजांना लक्ष करण्यात आले. १ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे जुहू येथे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे पाच गोळ्या झाडल्या. गँगशी संबंधित सोशल मीडिया खात्यांवरून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. याच्या काही काळानंतर फेब्रुवारी २०२६ मध्येच अभिनेता रणवीर सिंगच्या कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप व्हॉईस नोटद्वारे मोठ्या रकमेची खंडणी मागणारा मेसेज आला. यानंतर मुंबई पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने रणवीरच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेत पुढील तपास सुरू केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
- गोकुळ दूध संघ निवडणूक: हसन मुश्रीफांच्या मुलासह शौमिका महाडिक पराभूत, सतेज पाटलांची बाजी
- मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची जसप्रीत बुमराहशी तुलना; म्हणाला, ‘विश्वचषकातील पराभवानंतर त्याला बळीचा बकरा बनवलं’
Quick Answers
टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरात संध्याकाळी गोळीबार झाला. या हल्ल्यातून टायगर बचावला असला तरी त्याचा चालक जखमी झाला आहे.
१९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजाच्या नाराजीतून सलमान खान अनेक वर्षांपासून गँगच्या रडारवर आहे. १४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे वांद्रे येथील त्याच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स'बाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या १२ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली.
१ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे जुहू येथे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे पाच गोळ्या झाडल्या होत्या.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







