प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांची तब्येत अचानक बिघडून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचा प्रसंग अभिनेत्री केतकी थत्ते हिने नुकताच उलगडला आहे.
केतकीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रयोग बोरिवली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. आगाशे यांना खूप ताप होता आणि ते औषधेही घेत होते. प्रयोगाला निघताना केतकीने त्यांना स्वतः गाडी चालवण्याची तयारी दर्शवली होती. तसेच तब्येत बरी नसल्यास प्रयोग रद्द करण्याचीही विनंती केली होती. मात्र, त्यांनी या दोन्ही गोष्टींना नकार देत रंगमंचावर उभे राहण्याचा निर्णय घेतला.
नाटकाचा पहिला अंक सुरू झाल्यानंतर मध्यांतराकडे जाताना त्यांची तब्येत अधिकच खालावली. एका प्रसंगानंतर आत गेल्यावर त्यांना अचानक खूप उलट्या होऊ लागल्या. परिस्थिती इतकी बिघडली की तिथे बादली आणावी लागली. सतत होणाऱ्या उलट्यांमुळे अखेर मध्यांतरादरम्यान सहकलाकारांनी त्यांना पुढील प्रयोग न करू देण्याचा निर्णय घेतला. आगाशे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतानाही त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी अर्धे नाटक शिल्लक होते. त्यामुळे प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत देणे किंवा उरलेले नाटक वाचून दाखवणे, असे दोन पर्याय टीमसमोर होते. नाटकात केतकीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या संदेश कुलकर्णी आणि केतकीने प्रेक्षकांशी संवाद साधून हे दोन्ही पर्याय त्यांच्यासमोर ठेवले.
प्रेक्षकांनीही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, आपला अनुभव अर्धवट राहू नये यासाठी उर्वरित अर्धा अंक वाचून सादर करण्याची विनंती केली. यानंतर केतकी आणि संदेश यांनी स्क्रिप्ट हातात घेऊन वाचनातून संपूर्ण नाटक पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण सादरीकरणादरम्यान एकही व्यक्ती जागेवरून उठून गेली नाही, यातून प्रेक्षकांचे नाटकावरील प्रेम जाणवल्याची भावना केतकीने व्यक्त केली. हा प्रसंग सांगताना तिने, ‘अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये, हे जिवंत कलेचे एक उदाहरण आहे,’ असेही नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ दूध संघ निवडणूक: हसन मुश्रीफांच्या मुलासह शौमिका महाडिक पराभूत, सतेज पाटलांची बाजी
- मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची जसप्रीत बुमराहशी तुलना; म्हणाला, ‘विश्वचषकातील पराभवानंतर त्याला बळीचा बकरा बनवलं’
- प्रज्ञान ओझा बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष; रमेश पोवार यांचीही समितीत एन्ट्री
Quick Answers
अभिनेत्री केतकी थत्तेने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रयोग बोरिवली येथे आयोजित करण्यात आला होता.
डॉ. आगाशे यांना आधीच खूप ताप होता. नाटकाचा पहिला अंक सुरू झाल्यानंतर मध्यांतराकडे जाताना त्यांची तब्येत अधिक खालावली आणि एका प्रसंगानंतर त्यांना अचानक खूप उलट्या होऊ लागल्या.
प्रेक्षकांच्या विनंतीनुसार केतकी थत्ते आणि संदेश कुलकर्णी यांनी स्क्रिप्ट हातात घेऊन वाचनातून संपूर्ण नाटक पूर्ण केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








