गृहराज्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून ५ हजारांची फसवणूक; खेडमध्ये एकावर गुन्हा दाखल

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Published On: 

Yogesh Kadam gave clean chit to police in Pune Rape Case

रत्नागिरी, 19 ऑक्टोबर: राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पीए (स्वीय सहाय्यक) असल्याची बतावणी करून एका सामाजिक कार्यकर्त्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उघडकीस आला आहे. मंत्र्यांशी भेट घडवून तुमचे काम करून देतो, असे आमिष दाखवून ५ हजार रुपये घेतल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात रविराज चिखले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६, मूळ रा. बोरगाव-साळुंखेवाडी, ता. चिपळूण, सध्या मुक्काम मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत चिरा-दगड खाणींमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. हा मुद्दा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी साळुंखे प्रयत्न करत होते.

याचदरम्यान, आरोपी रविराज चिखले याने आपण मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे साळुंखे यांना भासवले. मंत्र्यांची भेट घडवून आणतो आणि संबंधित काम करून देतो, असे आश्वासन त्याने दिले. या बदल्यात १७ सप्टेंबर २०२६ रोजी खेड येथे चिखले याने साळुंखे यांच्याकडून ५ हजार रुपये रोख घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतर त्याने मंत्र्यांची भेटही घडवली नाही आणि दिलेले आश्वासनही पाळले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.२९ वाजता गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (२), ३१८ (४) आणि ३१९ (२) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून फसवणूक झाल्याच्या या प्रकारामुळे खेड परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याची बतावणी करून पैसे उकळल्याप्रकरणी रविराज चिखले याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही