छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात झालेल्या गोळीबाराने महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या मारेकऱ्यांनी रिव्हॉल्व्हरमधून श्रॉफवर सुमारे सात राऊंड फायर केले. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले लोक घरात सुरक्षित बसले असून, शहा आणि फडणवीस यांच्या संगनमतामुळेच गुन्हेगारांच्या मनातील भीती संपल्याचा आरोप राऊतांनी केला. राज्यात सातत्याने होणाऱ्या हत्या आणि गोळीबारामुळे ‘जंगलराज’ सुरू असल्याचेही राऊत म्हणाले.
राऊतांच्या या आरोपांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. राज्यात कोणतीही घटना घडली की यांना सत्तांतर हवे असते, असे सांगत नेत्यांनी बेछूट विधाने करण्याऐवजी घटनेचे गांभीर्य ओळखावे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. महाराष्ट्र आणि मुंबई सर्वांचीच आहे, याची आठवण करून देत शिरसाट म्हणाले की, “ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात घटना घडल्या नाहीत का? तुम्हाला व्हीसीवरून (VC) आरोपी पकडायचे होते. त्याच काळात नारायण राणे यांना ताटावरून उचलले, हे तुमचे कर्तृत्व आहे.”
सध्या मुंबईत पुन्हा ९० च्या दशकासारखे गँगवॉर सुरू झाले असल्याचे मान्य करत शिरसाट म्हणाले की, याची लागण संपूर्ण महाराष्ट्राला होऊ नये यासाठी सरकार कडक कारवाई करणार आहे. यासाठी राज्य शासन कृती आराखडा तयार करणार असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. १९९० ते १९९५ च्या युती सरकारच्या काळात गँगस्टर्सचे कंबरडे मोडण्यात आले होते, तेव्हा गुन्हेगार अंडरग्राऊंड झाले होते किंवा देश सोडून गेले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.
अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात बोलताना शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, तेवढीच भूमिका मांडण्याचा मला अधिकार आहे. कोणतीही घोषणा करण्याचा अधिकार मला नाही,” असे ते म्हणाले. पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या विरोधात जाता येत नाही. सतीश चव्हाण यांनी थोडाफार त्रास दिला असेल हे मान्य, मात्र पक्षाच्या विरोधात जाता येत नाही, हा संदेश आपण एकनाथ शिंदे यांना दिला असून तो त्यांना तातडीने मिळाला असेल, असेही शिरसाट म्हणाले. आपण आपल्या मनाची भूमिका मांडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार कोसळून नवा पंतप्रधान येणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
- गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात; उद्या कोण उधळणार गुलाल?
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांच्या खर्चात कपातीच्या सूचना
Quick Answers
टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोईच्या मारेकऱ्यांनी रिव्हॉल्व्हरमधून त्याच्यावर सुमारे सात राऊंड फायर केले.
संजय राऊत यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या संगनमतामुळेच गुन्हेगारांमधील भीती संपल्याचा आरोप केला, तसेच राज्यात सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांमुळे 'जंगलराज' सुरू असल्याचे म्हटले.
संजय शिरसाट यांनी म्हटले की राज्यात कोणतीही घटना घडली की यांना सत्तांतर हवे असते. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही घटना घडल्या होत्या, असा टोला त्यांनी लगावला.
गँगवॉरची लागण संपूर्ण महाराष्ट्राला होऊ नये यासाठी सरकार कडक कारवाई करणार असून राज्य शासन यासाठी कृती आराखडा तयार करणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








