संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; ‘शिवतीर्थ’वर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांच्या मनात रोष निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

Published On: 

Sanjay Raut meets Raj Thackeray

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांच्या मनात रोष निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज अचानक ‘शिवतीर्थ’वर पोहोचले असून त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदांचे वृत्त समोर आल्यापासून हे वातावरण अधिकच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा आयोगातील दोन सहआयुक्तांनी केला होता. तसेच, ‘एसआयआर’ (SIR) मुद्द्यावरून ज्ञानेश कुमार यांच्यावर विविध आरोप होत आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण देशात आणि विशेषतः दिल्लीत विरोधकांनी आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. काँग्रेस आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, गेल्या आठवड्यात सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील रेल्वे आणि मेट्रो सेवाही बंद ठेवावी लागली होती.

देशातील विरोधी पक्ष या मुद्द्यावर एकजूट झाले आहेत. दिल्लीतील आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. स्वतः संजय राऊत दिल्लीला जाऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान ते दिल्लीत घडणाऱ्या या सर्व राजकीय घडामोडींची माहिती त्यांना देऊ शकतात. दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही विरोधकांची भक्कम एकजूट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकत्रित येत एक विराट मोर्चा काढला होता. सध्या मनसेकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून राज ठाकरे स्वतः या आंदोलनात उतरले आहेत. राज ठाकरे अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत, मात्र त्यांची भूमिका मविआला अनुकूल आहे. देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

खासदार संजय राऊत अचानक 'शिवतीर्थ'वर पोहोचले आणि त्यांनी तिथे राज ठाकरे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही