‘क्रिकेटमध्ये एक नंबरचा रडी, पण सख्ख्या भावासारखी मदत…’; नाना पाटेकरांच्या शोकसभेत शिवाजी साटम गहिवरले

मुंबईत आयोजित नाना पाटेकरांच्या शोकसभेत अभिनेते शिवाजी साटम भावूक झाले. त्यांनी नानांसोबतच्या ४० वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से शेअर केले.

Published On: 

Nana Patekar NAAM Foundation

मुंबई, 15 ऑक्टोबर: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गोव्यातील निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नुकतीच मुंबईत नाना पाटेकर यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नानांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या तब्बल ४० वर्षांच्या आठवणी सांगताना शिवाजी साटम गहिवरले. त्यांनी सांगितले की, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना आणण्याचे श्रेय केवळ नानांना जाते. ‘यशवंत’ चित्रपटातील इन्स्पेक्टरच्या भूमिकेचा किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी त्यावेळी नाटक आणि ‘एक शून्य शून्य’ या मालिकेचे काम करत असल्याने चित्रपटातील ती भूमिका नाकारली होती. पण निर्मात्याने थेट नानाला फोन लावला. तेव्हा नानाने फोनवरून त्याच्या ‘संस्कृत’ भाषेत (शिव्या देत) मला समजावले आणि अखेर मी होकार दिला.”

वरळीतील रायफल क्लबमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाचा आणखी एक प्रसंग साटम यांनी सांगितला. शूटिंगवेळी नाना आणि शफी इनामदार उपस्थित होते. नानाने साटम यांना मानधनाबाबत विचारले. ठरलेली रक्कम ऐकल्यावर नाना संतापला आणि त्याने पुन्हा शिव्या दिल्या. त्याने निर्मात्याला बोलावून दोन तास उभे केले आणि ‘पुढच्या वेळी योग्य मानधन द्यायचे,’ असे ठणकावून सुनावले. तो निर्माताही निमूटपणे सगळे ऐकत होता, अशी आठवण साटम यांनी शेअर केली.

‘गुलाम ए मुस्तफा’ चित्रपटाच्या वेळी आलेला अनुभव सांगताना साटम अधिक भावूक झाले. नानाने स्वतःच्या तोडीसतोड असलेली ही भूमिका साटम यांना दिली होती. मात्र, नेमक्या त्याच काळात साटम यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले. पत्नीसाठी रोज रुग्णालयात जावे लागणार असल्याने साटम यांनी शूटिंग सोडण्याचा निर्णय घेतला. पण नानाने त्यांना थांबवले आणि दिग्दर्शकाशी बोलून त्यांच्या वेळेत (दुपारी १२ ते रात्री ८) बदल करून दिला. “सख्ख्या भावानेही जेवढे केले नसते, तेवढे नानाने माझ्यासाठी केले,” अशा शब्दांत साटम यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सेटवरील गमतीजमती आठवताना साटम यांनी सांगितले की, सेटवर क्रिकेट खेळताना नाना एक नंबरचा ‘रडी’ होता. “तो कधी आऊटच मान्य करत नसे, त्यामुळे मी त्याच्यासोबत खेळायला नकार द्यायचो,” असे सांगत साटम यांनी नानाच्या खोडकर स्वभावाची आठवण काढली. कधीही अचानक फोन करून शेतावर बोलावणारा मित्र आज आपल्यात नाही आणि त्याला श्रद्धांजली वाहावी लागतेय, याची खंत व्यक्त करताना शिवाजी साटम यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही