ठाणे, 15 ऑक्टोबर: ठाणे महानगरपालिकेतील एमआयएम (MIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा सध्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, युनुस शेख यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असून आपण अद्याप एमआयएमचेच काम करत असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी, शिंदे यांच्याशी संलग्न असलेल्या संघटनेचे पद स्वीकारल्यानंतर त्यांनी एखाद्या कट्टर शिवसैनिकाप्रमाणे एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आहे.
गेली ४० वर्षे केबल आणि इंटरनेट व्यवसायात असलेल्या युनुस शेख यांना अखिल भारतीय केबल संघटनेच्या कळवा-मुंब्रा परिसराचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या नियुक्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, एमआयएमची कोणतीही केबल व्यावसायिकांची संघटना नसल्याने मी या संघटनेशी जोडलो गेलो आहे. मला शिवसेनेत प्रवेश करायचा असता, तर मी थेट एकनाथ शिंदे यांच्याच हातून नियुक्तीपत्र घेतले असते. त्यामुळे शिवसेना चिन्ह असलेला गमछा घातला किंवा नियुक्तीपत्र घेतले, याचा अर्थ मी पक्षात प्रवेश केला असा होत नाही.
शिवसेनेत जाण्यास कोणतेही बंधन नसून आपण कधीही प्रवेश करू शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. ‘एकनाथ शिंदे हे सर्वांचेच बॉस आहेत आणि आमचेही बॉस आहेत. त्यांच्या पक्षात जाण्यात फायदाच आहे. जरी त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी असला, तरी त्या माणसासोबत जाण्यात नक्कीच फायदा आहे’, असे शेख यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच शिवसेना वाढत असून त्यांना आमची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
आपल्या कुटुंबाचे आणि एकनाथ शिंदे यांचे गेल्या ४० वर्षांपासूनचे जुने संबंध असल्याची आठवण त्यांनी करून दिली. जुन्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिंदे कधीही विसरत नाहीत. जेव्हा आमच्यावर संकट आले, तेव्हा असदुद्दीन ओवेसी आणि एकनाथ शिंदे हे दोघेही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असे शेख यांनी स्पष्ट केले. शिंदे यांना सांगितल्यास याहूनही मोठे पद मिळू शकते, परंतु तसे काही नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करू’ अशी घोषणा करणाऱ्या सहर शेख या युनुस शेख यांच्या कन्या आहेत. आता याच युनुस शेख यांना शिंदे सेनेच्या संलग्न संघटनेत महत्त्वाचे पद मिळाल्याने आणि त्यांनी एमआयएममध्येच असल्याचे सांगत शिंदेंना ‘बॉस’ म्हटल्याने, ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कसोटीत पुनरागमनावर झालेल्या टीकेला निक मॅडिन्सनचे सडेतोड उत्तर
- पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जिल्ह्यात २० टक्के पाणीकपातीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
- अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची FRRO ची नोटीस; उच्च न्यायालयात घेतली धाव
Quick Answers
युनुस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत आणि आपण अद्याप एमआयएमचेच काम करत असल्याचा दावा केला आहे.
युनुस शेख यांना अखिल भारतीय केबल संघटनेच्या कळवा-मुंब्रा परिसराचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
एमआयएमची कोणतीही केबल व्यावसायिकांची संघटना नसल्यामुळे आपण या संघटनेशी जोडले गेलो, असे युनुस शेख यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे हे सर्वांचेच बॉस असून आमचेही बॉस आहेत, त्यांच्या पक्षात जाण्यात फायदाच आहे, असे युनुस शेख यांनी म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






