गौतम गंभीर यांच्या वाढदिवसाचा वेस्ट इंडिजने केला बेरंग! चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा २४ धावांनी पराभव

हैदराबादमधील चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर २४ धावांनी विजय मिळवला. शाई होपच्या शतकामुळे भारताचे २४८ धावांचे लक्ष्य अपुरे पडले.

Published On: 

MHD LOGO

हैदराबाद, 15 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वाढदिवशी मालिका विजयाचे स्वप्न भंगले आहे. १४ ऑक्टोबर रोजी गंभीर ४५ वर्षांचे झाले, त्यामुळे संघाकडून त्यांना मालिका विजयाची भेट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव करत या आनंदावर विरजण घातले. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ३ बाद २४७ धावांचा डोंगर उभा केला. या मालिकेत भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने संघासाठी सर्वाधिक १०२ धावांची शतकी खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव यांनी यश मिळवले.

२४८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १९.४ षटकांत २२३ धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी संजू सॅमसनने २३ चेंडूत सर्वाधिक ५६ धावा फटकावल्या. मात्र, वेस्ट इंडिजच्या कीमो पॉलने पाच बळी घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. डावाच्या पाचव्या षटकात पॉलने इशान किशन आणि सॅमसन या दोघांनाही तंबूत पाठवले. इशानला केवळ ६ धावाच करता आल्या.

संघाच्या इतर फलंदाजांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अभिषेक शर्मा २४ चेंडूत २९ धावांवर बाद झाला, तर नमन धीरला शून्यावर माघारी परतावे लागले. मधल्या फळीत तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघर्ष करत ३२ चेंडूत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिलकने २५ चेंडूत ४३, तर नितीशने २० चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेल केवळ ३ धावा करू शकला आणि प्रिन्स नाबाद राहिला. दरम्यान, हाताला दुखापत झाल्यामुळे अर्शदीप सिंगला 'रिटायर्ड आऊट' होऊन मैदान सोडावे लागले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

हैदराबाद येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव केला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही