प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात त्यांनी पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाण्यामध्ये २९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वतः पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला होता. आता सदावर्ते यांनीही अगदी तशीच भूमिका घेतली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. पहिल्यांदा एफआयआरमध्ये नाव का नव्हते आणि पुरवणी जबाबात नाव येऊनही त्यांना आरोपी का करण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळेच या प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांचा दबाव दिसून येत असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला.
यावेळी सदावर्ते यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले. 'एकनाथ शिंदे तुमच्याकडे आले होते का?' असा थेट सवाल त्यांनी कुटुंबीयांना विचारला. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास होत नसल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असून पालकाचा अर्थ जबाबदारी असा होतो. त्यामुळे त्यांनी याबाबत खुलासा करून राजीनामा दिला पाहिजे.
भारताचे संविधान हे आपले सुरक्षा कवच असून राजकारणापलीकडे जाऊन लोक तुमच्या पाठीशी असल्याचे सदावर्ते यांनी कुटुंबीयांना सांगितले. लोकांना आपल्या भावनाही व्यक्त करू दिल्या जात नाहीत. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे यांची 'बॉडी लँग्वेज' तुम्ही पाहिली का? आम्ही थेट बोलणारी माणसं आहोत, असे म्हणत सदावर्ते यांनी तपास यंत्रणा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क घेऊ नका, घेतलेले परत करा : चंद्रकांत पाटील
- आयपीएल लिलावापूर्वीच खेळाडूंची मोठी अदलाबदल; टी. नटराजनची हैदराबादमध्ये घरवापसी, तर अन्सारी दिल्लीत
- २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी रॉबिन उथप्पाने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ; वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसनला संधी
Quick Answers
ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यामध्ये २९ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असून पालकाचा अर्थ जबाबदारी असा होतो, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाबाबत खुलासा करून राजीनामा दिला पाहिजे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






