प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर अखेरीपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, यामुळे राज्यातील सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
या मदतीसाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या सरकारांकडून अंतिम मदत म्हणून केवळ एक हजार रुपये दिले जात होते, मात्र आता किमान पाच हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, त्या सर्वांना ही मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून १०० टक्के पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याचे नियोजन आहे. कालपर्यंत ८३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, केवळ पंचनामा आणि नुकसान हेच मदतीचे निकष असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आचारसंहितेचे कारण देत काही अधिकारी दुष्काळी आढावा बैठकांना उपस्थित राहत नसल्याची तक्रार काही मंत्र्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आचारसंहितेचे कारण सांगून बैठकीला न येणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सांगा, त्या सर्वांना निलंबित केले जाईल, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत मंत्र्यांनी आपले अधिकार वापरावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, आज राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सीजेपी आंदोलनाचा फटका, पोलिसांची ‘देश सोडा’ नोटीस; आमिर खानचा भाचा इमरान खान पुन्हा चर्चेत
- बिग बॅश लीग २०२६-२७: ट्रेंट बोल्टची सिडनी थंडर संघात एन्ट्री, डेव्हिड वॉर्नरला मिळणार साथ
- IND vs WI ५ व्या टी-२० पूर्वी अर्शदीप सिंगच्या दुखापतीवर संजू सॅमसनची मोठी अपडेट
Quick Answers
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून सुमारे ६ हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ पंचनामा आणि नुकसान हेच मदतीचे निकष आहेत. कालपर्यंत ८३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून दिवाळीपूर्वी ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, त्या सर्वांना ही मदत दिली जाणार आहे.
आचारसंहितेचे कारण सांगून बैठकीला न येणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सांगा, त्या सर्वांना निलंबित केले जाईल, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






