Share

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल गांधींच्या कायदेशीर टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

निवडणूक आयोगावर अनियमिततेचा आरोप करत राहुल गांधींच्या कायदेशीर पथकाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Published On: 

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: निवडणूक आयोगाच्या कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कायदेशीर पथकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात करण्यात आली आहे.

या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, संजय राऊत, तेजस्वी यादव, सौगत रॉय, डी. राजा, एम. बेबी, महुआ मांझी आणि ई. टी. बशीर या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत तक्रार मांडण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला नाही. त्याऐवजी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानंतर ही कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही