Share

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे जिव्हाळ्याचे संबंध; संजय राऊत यांची मिश्किल टिप्पणी

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेवर संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Sanjay Raut meets Raj Thackeray

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि फडणवीस यांचे ‘जिव्हाळ्याचे संबंध’ असल्याची मिश्किल टिप्पणी करत भाजपवर निशाणा साधला आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कदाचित त्यांच्या मंत्र्यांचे ऐकणार नाहीत, मात्र राज ठाकरेंचे नक्की ऐकतील. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसेवा आयोगाचा गैरवापर करून प्रशासनात आणि नोकऱ्यांमध्ये विशिष्ट विचारांची माणसे आणली जात आहेत. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून पकडलेले आठही जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसेवा आयोगातही याच पद्धतीचे लोक भरल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

न्यायव्यवस्थेतही भाजपने आपली माणसे घुसवल्याचे राऊत म्हणाले. केवळ न्यायालयाच्या निकालाने प्रश्न सुटले असते तर देशात सर्वकाही आलबेल असते. हजारो विद्यार्थी घरदार सोडून रस्त्यावर दिवस-रात्र उपाशीपोटी संघर्ष करत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या या भावना समजून घेऊन त्यानुसार कारवाई केली पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.

दरम्यान, एमपीएससीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री या विषयावर पूर्णपणे सकारात्मक असल्याचे जाणवले असून, येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही संयम ठेवावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही