प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ने (UIDAI) एक नवे सुरक्षा फिचर आणले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या आपला आधार क्रमांक पूर्णपणे लॉक करता येणार आहे. आधार कार्डचा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
याआधीच्या बायोमेट्रिक लॉक पर्यायामध्ये केवळ फिंगरप्रिंट, आयरीस आणि ओटीपी (OTP) लॉक करण्याची सुविधा होती, मात्र आधार क्रमांक खुला असायचा. नव्या सुविधेअंतर्गत आधार क्रमांकच लॉक केल्यास, त्याद्वारे कोणीही पडताळणी करण्याचा प्रयत्न केल्यावर सिस्टीमवर त्वरित एरर दिसेल. आधार लॉक असले तरीही लोकांची महत्त्वाची कामे अडू नयेत यासाठी १६ अंकी ‘व्हर्च्युअल आयडी’चा (VID) वापर करता येईल. हा आयडी पूर्णपणे सुरक्षित असून तो ट्रॅक करता येत नाही. आधार लॉक करण्यापूर्वी अधिकृत अॅप किंवा पोर्टलवरून हा आयडी जनरेट करणे आवश्यक आहे.
आधार लॉक करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नसून युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवरील अधिकृत ‘एम-आधार’ (mAadhaar) अॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अॅपमध्ये पिन टाकून लॉग इन केल्यानंतर होम पेजवरील सिक्युरिटी पर्यायामध्ये जाऊन ‘व्हर्च्युअल आयडी आणि आधार लॉक’वर टॅप करावे लागेल. त्यानंतर ‘आधार लॉक’ निवडून अटी मान्य कराव्या लागतील आणि आपला व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी आणि ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आधार क्रमांक यशस्वीपणे लॉक होईल.
सध्या सरकारी आणि खाजगी कामांसाठी तसेच नव्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे नवे डिजिटल सुरक्षा कवच विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि आधारचा नेहमी वापर न करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून फसवणुकीच्या धोक्याला यातून मोठा आळा बसेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवसातून काही क्षण मनमोकळेपणाने हसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मिळतील अनेक फायदे
- नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; ‘तिरंगा’च्या सेटवरील भाजीचा किस्सा चर्चेत
Quick Answers
या नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या आपला आधार क्रमांक पूर्णपणे लॉक करता येणार आहे, ज्यामुळे आधार कार्डचा संभाव्य गैरवापर टाळण्यास मदत होईल.
आधार लॉक असले तरीही कामे सुरळीत चालण्यासाठी १६ अंकी ‘व्हर्च्युअल आयडी’चा (VID) वापर करता येईल. हा आयडी पूर्णपणे सुरक्षित असून तो ट्रॅक करता येत नाही.
नागरिक स्मार्टफोनवरील अधिकृत ‘एम-आधार’ (mAadhaar) अॅपमध्ये लॉग इन करून, सिक्युरिटी पर्यायातील ‘आधार लॉक’ निवडून, व्हर्च्युअल आयडी, ओटीपी आणि ‘फेस ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून आधार क्रमांक लॉक करू शकतात.
हे सुरक्षा कवच विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि आधारचा नेहमी वापर न करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









