पुणे पदवीधरची जागा हातून जाणे हे अपयश; सुनील तटकरेंची स्पष्ट कबुली

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला आलेले अपयश हे सामूहिक असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मान्य केले आहे.

Published On: 

Sunil Tatkare on Prashant Kishor meeting

मुंबई, 7 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची हक्काची जागा राखण्यात अपयश आले आहे. मंगळवारी मुंबईत बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केले. ही जागा पदरात पाडून घेण्यात आपण कमी पडलो असून, हे आपले सामूहिक अपयश मानले पाहिजे अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.

यापूर्वी याच मतदारसंघातून अरुण लाड हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यामुळे या जागेसाठी पक्षाचा मोठा आग्रह होता. मात्र, ही जागा हातून गेल्याने राष्ट्रवादीची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

तटकरे यांनी सांगितले की, महायुतीतील जागावाटपाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर घेण्यात आला. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याने त्यांनी एकट्यानेच या चर्चा केल्या, यातून कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी आहे. त्यामुळे वाटाघाटींसाठी अजूनही वेळ असल्याचे तटकरे म्हणाले. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढली जावी, यासाठी चर्चा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पक्षांतर्गत चर्चा करून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही