Share

‘वयाच्या ६० नंतर पुढाऱ्यांनी थांबायला हवं, कारण…’ इंदुरीकर महाराजांचं राजकारण्यांवर थेट भाष्य

वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर पुढाऱ्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असा थेट सल्ला प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून दिला आहे.

Published On: 

Indurikar Maharaj speaking about politicians during kirtan in Madha

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तासंघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी एका नव्याच चर्चेला तोंड फोडलं आहे. नेहमी आपल्या रोखठोक आणि मिश्किल शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी थेट राजकीय नेत्यांच्या निवृत्तीच्या वयावर बोट ठेवलंय.

माढा तालुक्यातील अंजनगाव येथे झालेल्या एका कीर्तनादरम्यान त्यांनी पुढाऱ्यांना खडेबोल सुनावले. राजकारण्यांनी वयाची साठ वर्षे ओलांडल्यानंतर सत्तेच्या राजकारणातून थांबायला हवं, असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला आहे. वय वाढलं की माणसाची बौद्धिक पातळी खालावते आणि काही पुढारी अक्षरशः वेड्यासारखे वागू लागतात, असं अत्यंत परखड मत त्यांनी यावेळी मांडलं.

Indurikar Maharaj Speech

“जसजसं वय वाढतं, तसतसे पुढारी वेडे व्हायला लागतात,” असं म्हणत त्यांनी सत्तेला चिकटून राहणाऱ्या प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळेच एका विशिष्ट वयात थांबण्यातच खरी शान आहे आणि यामुळे समाजात इज्जतही टिकून राहते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

सत्तेचा अवास्तव हव्यास बाळगून ‘सगळं मलाच पाहिजे’ या मानसिकतेतून नेत्यांनी आता बाहेर पडण्याची गरज आहे. योग्य वेळी पदत्याग केल्यास स्वतःची प्रतिष्ठा जपली जाते, असं अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सुचवलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांचं हे विधान सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

राजकारण्यांनी वयाची साठ वर्षे ओलांडल्यानंतर सत्तेच्या राजकारणातून थांबायला हवं, असा स्पष्ट सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही