Share

हार्दिकचा पत्ता पुन्हा कट, टीम इंडियात मराठमोळ्या शिलेदाराची थेट एन्ट्री

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातील एकदिवसीय मालिकेसाठी दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी मुंबईच्या मराठमोळ्या सूर्यांश शेडगेची निवड करण्यात आली आहे.

Published On: 

Hardik Pandya Replacement - Suryansh Shedge selected in India A squad against Australia

प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दुखापती यांचं नातं काही केल्या तुटताना दिसत नाहीये. सततच्या दुखापतींमुळे हार्दिकचा पुन्हा एकदा संघातून पत्ता कट झाला आहे. पण, हार्दिकच्या या दुखापतीने एका मराठमोळ्या शिलेदारासाठी टीम इंडियाची दारं मात्र सताड उघडी केली आहेत.

थोडक्यात सांगायचं तर, मुंबईचा युवा आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने (Suryansh Shedge) भारत ‘अ’ संघात थेट हार्दिकची जागा घेतली आहे. मंगळवारपासून पुदुचेरी येथे भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यांशने बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) फिटनेस टेस्ट पास केली असून तो पुदुचेरीला रवानाही झाला आहे.

Hardik Pandya News

हार्दिकच्या उजव्या पोटरीला अजूनही दुखापत सतावत असल्याने त्याचं पुनरागमन आता आणखी लांबणीवर पडलं आहे. दुसरीकडे, सूर्यांशला थेट ‘अ’ संघात संधी मिळाल्याने त्याला ११ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या चंदीगडविरुद्धच्या मुंबईच्या पहिल्या रणजी सामन्याला मुकावं लागणार आहे. ६, ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात हे सामने रंगणार आहेत.

सूर्यांशने नुकतीच श्रीलंकेत झालेल्या त्रिकोणीय मालिकेत ‘इंडिया अ’ कडून शानदार कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यात १४७ धावा करत २३ षटकं गोलंदाजीही केली होती. विशेष म्हणजे, २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने २५१.९२ च्या तुफानी स्ट्राईक रेटने धावा कुटल्या होत्या. मध्येच दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागली होती, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.

या सगळ्या घडामोडीत आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यर कनेक्शन. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या सूर्यांशची श्रेयस अय्यरसोबतची मैत्री खूप जुनी आहे. या दोघांनी मुंबईसाठी अनेक सामने एकत्र गाजवले आहेत. क्रिकेट वर्तुळात अशीही चर्चा आहे की, सूर्यांशला पंजाब संघात घेण्यामागे आणि त्याला भारतीय संघात मिळालेल्या संधीमागे श्रेयसचा मोठा वाटा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही