रुपेरी पडद्यावर आपल्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा गोविंदा (Govinda Sunita Controversy) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजाने केलेले विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप, घटस्फोटाची नोटीस आणि आता एका तरुण अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जाणं, या सगळ्यामुळे गोविंदाच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलंय. या सर्व घडामोडींवर आता खुद्द गोविंदानेच मौन सोडत पत्नीला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
झालं असं की, नुकतंच एका जन्माष्टमीच्या कार्यक्रमात गोविंदाने हजेरी लावली होती. तिथे त्याने आपला जलवा दाखवलाच, पण आपल्या आगामी सिनेमाची घोषणा करत खासगी आयुष्यातील वादावरही पहिल्यांदाच भाष्य केलं.
Govinda Sunita Controversy
“देवाने आधीच अनेक गोष्टी ठरवलेल्या आहेत. सर्वकाही लवकरच साफ होईल आणि गोविंदा सर्व ठीक करेल, अशी मी प्रार्थना करतो,” असं सूचक वक्तव्य त्याने यावेळी केलं. सोबतच, नव्या सिनेमातून कमबॅक करत असून यासाठी प्रेक्षकांची साथही त्याने मागितली आहे.
या संपूर्ण वादाला खरी फोडणी मिळाली ती अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्या एन्ट्रीमुळे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि कोमल राणी एकत्र स्पॉट झाले होते. त्यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर सुनीता यांचा राग अनावर झाला. “लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरताना त्याला लाज वाटत नाही का?” असा थेट सवाल सुनीता यांनी सर्वांसमोर उपस्थित केला होता.
पत्नीच्या या बोचऱ्या टिकेनंतर गोविंदाही शांत बसला नाही. “सुनीताने स्वतःच्या मर्यादा विसरू नयेत, पुढे कधीतरी तिला माझी गरज लागेलच,” असं सडेतोड उत्तर देत त्याने वादात आणखीच भर घातली. दुसरीकडे, सुनीता यांनी घटस्फोटाचा अर्ज अचानक मागे घेतल्याने चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पूनम पांडेची अत्यंत वादग्रस्त मागणी, वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्यावर ठाम; नेटकऱ्यांमध्ये खळबळ
- महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दणका, पाकिस्तानला सर्वात नीचांकी धावसंख्येवर रोखलं!
- ‘एकनाथ शिंदेंनी पाप केलंय, त्यांना मराठ्यांचा तळतळाट लागेल’; मनोज जरांगे पाटलांची टीका










